Jamal Kudu Dance Viral Video: सोशल मीडिया हे आजच्या काळात एक असं व्यासपीठ बनलंय जिथे रोज काहीतरी व्हायरल होत असतं. सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. इथे कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात जे तुम्हाला भावूक करतात, कधी हसणं आवरणं कठीण होतं तर कधी खूप आश्चर्यचकित करून ठेवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडीओ एका आजीचा आहे. या आजींचं वय झालं असलं तरीही त्यांनी इतका हटके डान्स केलाय की शेजारी बसलेले आजोबाही उड्या मारत तिच्याजवळ येऊन डान्स करू लागले आहेत.

अॅनिमल चित्रपटातल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. ‘ॲनिमल’मधील ‘जमाल कुडू’ या गाण्याची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. या गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे. ‘जमाल कुडू’ गाण्याचे सोशल मीडियावर खूप फॅन्स आहेत. सेलिब्रिटींपासून-सामान्यांपर्यंत अनेकांनी गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. आता एका आजीने या गाण्यावर जबरदस्त डान्स करत नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या वयातील एनर्जीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. इन्स्टाग्रामवर आजीच्या डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

(हे ही वाचा : शेतात बिबट्यासमोर उभं राहून सेल्फी बहाद्दराचं फोटोसेशन; व्हिडीओ पाहून लोकं म्हणाले, “एवढं धाडस येतं कुठून?” )

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आजी ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स करताना हा व्हिडिओ सिद्धेश बोबाडी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, वृद्ध महिला स्वयंपाकघरात चहा बनवल्यानंतर तिच्या डोक्यावर एक कप ठेवते. त्यानंतर आजी चहाचा कप डोक्यावर ठेवून स्वयंपाकघरातून नाचत नाचत हॉलमध्ये येऊन नाचू लागते. घरात बसलेले सर्व मंडळी आजीला पाहून चकीतच होतात. गाण्यावरील आजीच्या स्टेप तर एक नंबर आहेत हे पाहून बसलेले आजोबा उठून आजीसोबत आनंदी होऊन डान्स करु लागतात आणि आजीच्या डोक्यावरील चहाचा कप उचलून चहा पित आजोबाही आजीसोबत थिरकू लागतात. आजी आजोबांचा डान्स पाहून त्यांच्या मुलाला आणि नातीला धक्का बसल्याचे, व्हिडिओमध्ये दिसत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत आतापर्यंत १२.६ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक लोकांनी आजीच्या भन्नाट डान्सवर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले, “आतापर्यंतचा ‘जमाल कुडू’ गाण्यावरील हा सर्वात चांगला व्हिडिओ आहे.” तर दुसऱ्याने म्हटले, “सुंदर आयुष्य जगण्यासाठी अशी धमाल करायला हवी.”

Story img Loader