डान्स ही एक अशी कला आहे की तुम्ही जगाला वेड लावू शकता. डान्स करण्याला कोणतीही भाषा गरजेची नसते, सीमाही महत्वाची नसते. कोणत्याही धर्माचे, जातीचे बंधन नाही. अमेरिकेतील मियामीमधला एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये पगडी घातलेला शीख तरूण जबरदस्त हिप-हॉप डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून सारेच जण त्याचे चाहते झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ढोल-नगाडे वाजून म्यूजिक सुरू झालं की अगदी माणूस आहे त्या ठिकाणीच थिरकू लागतो. मग अगती तो जगभरातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला माणूस का असेना…मग या व्हिडीओमध्ये तर अस्सल पंजाबी पाजी आहेत. गाण्याचे बिट्स वाजत असताना पंजाबीयन्सनी शांत बसणं निव्वल अशक्यच. आतापर्यंत तुम्ही पंजाबीयन्सना केवळ भांगडा डान्स करताना खूपदा पाहिलं असेल. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पंजाबी तरूणाचा भांगडा नव्हे तर चक्क हिप-हॉप डान्सचा आहे. पगडी घातलेल्या या तरूणाने हिप-हॉप गाण्यावर असा जबरदस्त ठेका धरला की त्याचा उत्साह पाहून सर्व नेटकरी त्याचे फॅन बनू लागले आहेत.
हा व्हिडीओ turbanmagic नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. “मियामीमध्ये असताना… तिकडचे लोक डान्स करत होते आणि तरूणांनी मला त्यांच्यासोबत सामील होण्यासाठी प्रोत्साहित केलं.” या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरूणांचा ग्रूप सार्वजानिक ठिकाणी एकत्र डान्स करत आहेत. सगळे अगदी दिलखुलासपणे एकत्र डान्स करत होते. एका कोपऱ्यात हा पगडी परिधान केलेला शीख तरूण त्यांना पाहत असतो. आता समोर गाण्यांचे बीट्स आणि डान्स पाहून एक पंजाबी व्यक्ती स्वतःवर आवर तरी कसा घालेल. त्या तरूणांचे डान्स स्टेप्स पाहून या शीख व्यक्तीला स्वतःवर आवर घालणं अवघड जात होतं. हा तरूण आहे त्याच ठिकाणाहून गाण्यावर थिरकण्यास सुरूवात करतो. त्यानंतर तो हळुहळु तो तरूणांच्या ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी पुढे पुढे येतो. हे पाहून ग्रूपमधल्या एका तरूणाने या शीख तरूणाला डान्स करण्यासाठी पुढे खेचलं. मग काय, पंजाबी तरूणाने त्याच्या डान्सच्या अदाकारीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
या व्हिडीओमध्ये डान्स करताना शीख तरूणाचे डान्स स्टेप्स इतके जबरदस्त आहेत की हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाही. हिप-हॉप डान्स करत असताना या शीख तरूणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. भांगडावर थिरकणारे पंजाबी हिप-हॉप करताना कसे दिसतील हे पाहण्याची तुमची उत्सुकता आम्ही आणखी वाढवणार नाहीत. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : शाबास! त्या दोन शाळकरी मुलांनी दाखवली माणुसकी, काही सेकंदाच्या Viral Video ने शिकवला धडा
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : पोपटासोबत व्हिडीओ बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पाच दिवसांत या व्हिडीओला पाच लाख लोकांनी पाहिलं आहे. यात नाचणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे समिंदर सिंग धिंडसा असं असून त्याने आपल्या डान्सने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओला ५१ हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो शेअर्स आले आहेत. शेकडो लोकांनी कमेंट करून या शीख तरूणाच्या डान्सचे कौतुक केले आहे.