यंदाच्या वर्षी लग्नाचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले. अजूनही लग्नाचा सीजन सुरु असल्यामुळे रोज वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. असाच एक हटके नवीन लग्नाचा व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही नक्कीच हसाल आणि आश्चर्य व्यक्त करालं. या व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नासाठी खास डिझाइन केलेलं बूट दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय होत?

या मजेदार व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचे मस्त पॉलिश केलेले चमकदार बूटदिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? पण व्हिडीओमध्ये पुढे बघितल्यावर त्या बूटामध्ये नक्की काय नवीन आहे हे दिसून येत. याला नक्की स्पेशल बूट का म्हटल जात आहे हे आपल्याला लक्षात येत.

(हे ही वाचा: दोन जेसीबींनी मिळून केला तिसर्‍यावर हल्ला, मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर Viral)

डोळ्यांची फसवणूक!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने चमकणारा बूट घातला आहे आणि तो या बुटाची खासियत सांगत आहे. तो सांगतो की हा बूट महागडा, डिझायनर आणि लग्नासाठी योग्य आहे. एवढ्या कौतुकानंतर व्हिडीओच्या शेवटी बुटाचे सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला हसायला येईल. वास्तविक, या बूटामध्ये केवळ वरचा भाग वापरण्यात आला आहे. त्याच्या सोलऐवजी, व्यक्तीने चप्पल घातली आहे.

(हे ही वाचा: Ind vs SA: …आणि मैदानावर विराट कोहलीने केला भन्नाट डान्स; व्हिडीओ Viral)

(हे ही वाचा: Viral: या फोटोत तुम्हाला किती घोडे दिसत आहेत? उत्तर देणं आहे कठीण )

नेटीझन्सची प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एक वापरकर्ता लिहतो की, ‘हे बूट कोणत्या मार्केटमध्ये मिळतील आणि त्याची किंमत किती आहे?’ तर दुसरा वापरकर्ता लिहतो की, ‘हा बूट पार्टीला घालता येईल का?’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral desi jugaad special shoes made for the wedding you too will laugh when you see the video ttg