प्रत्येक व्यक्ती नोकरी लागल्यानंतर आपल्या पहिल्या पगारातून जवळच्या व्यक्तींना काहीतरी खास गिफ्ट देत असतो. शिवाय पहिल्या पगारातून गिफ्ट खरेदी करुन  जवळच्या व्यक्तींना देण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशातच जर मोठ्या भावाने आपल्या लहान भावंडांना काही सरप्राईझ गिफ्ट दिलं तर त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. सध्या अशाच एका सरप्राईझ गिफ्टमुळे लहान भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये एक मोठा भाऊ त्याच्या पहिल्या पगारातून लहान भावाला महागडे शूज गिफ्ट देताना दिसत आहे. लहान भाऊ झोपेत असताना त्याचा मोठा भाऊ एक बॉक्स घेऊन आल्याचं दिसतं आहे. मोठा भावाने आणलेले बॉक्स उघडल्यानंतर त्यात असणारे महागडे आणि आवडीचे शूज बघताच लहान भाऊ मोठ्या भावाला प्रेमाने घट्ट मिठी मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा क्षण खूप भावनिक असून तो पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याचं सांगितलं आहे.

हेही पाहा- Video: चिमुकल्याने चालु स्कूटीचा अचानक अ‍ॅक्सिलेटर फिरवला अन्…; मुलांकडे दुर्लक्ष करणे जीवावर कसे बेतू शकते एकदा पाहाच

दोन भावांमधील प्रेम दाखवणारा हा इंस्टाग्रामवर goodnews_movement नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये लहान भाऊ भावनिक होत आपल्या मोठ्या भावाला घट्ट मिठी मारतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येताना दिसतं आहे. तर लहान भावाचा आनंद पाहून मोठा भावाला देखील खूप आनंद झाल्याचं दिसतं आहे.

या भावंडांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आत्तापर्यंत तो २.५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावनिक झाले आहेत. तर आपणही पहिल्या पगारातून भावाला आवडीचे वस्तू भेट देणार असल्याची कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर आपल्या लहान भावाची इच्छा पुर्ण करणं प्रत्येक मोठ्या भावाचं काम असल्याचंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.