Lioness Antelope Fight Video: जंगलात जेव्हा कधी सिंहाचा आणि काळवीटाचा सामना होतो तेव्हा असे मानले जाते की नेहमी सिंह जिंकतो. परंतु, कधी कधी काळवीट देखील सिंहाच्या तावडीतून सुटते. मात्र, असे क्वचितच पाहायला मिळते. सिंह आपली शिकार चुकूनही सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सिंहीणीच्या हल्ल्यातून एक धूसर काळवीट (Sable Antelope) बचावला आहे. हे काळवीट जवळपास मृत्यूच्या कचाट्यात सापडला होते. पण, आपल्या शिंगाने हल्ला करत ते सिंहणीच्या तावडीतून निसटले. हा थरारक व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळवीट (Sable Antelope) एका नदीकिनारी पाणी पित आहे. तेवढ्यात पाठीमागून त्याठिकाणी सिंहीण येते आणि त्याच्यावर हल्ला करते. ती अक्षरशः त्याचे तोंड आपल्या जबड्यात पकडते. मात्र, सिंहणीच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ते काळवीट आपल्या शिंगांचा वापर करते आणि स्वतःची सुटका करते. स्वतःचा बचाव करण्यासाठी, काळवीटाने आपल्या शिंगांचा वापर करून सिंहिणीला त्याच्या पाठीवरून ढकलून लावल्यावर सिंहीणीला वाटले की हा आपल्यावरच पलटवार आहे आणि स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात सिंहिण तलावात उडी मारते.
( हे ही वाचा: Video: तब्बल ९ तासांच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने वाजवला सेक्सोफोन; प्रतिक्रिया देत म्हणाला, “यामुळे मला खूप…”)
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: Viral Video: कुर्ल्यात चालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच आणली रिक्षा, आरपीएफ जवान धावत पोहोचले अन्….)
व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्ते हैराण झाले
हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘द डार्क साइड ऑफ नेचर’ नावाच्या हँडलद्वारे शेअर केला असून याला एक मिलियनहुन जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच याला ७२,००० अधिक लोकांनी लाईक देखील केले आहे. तसंच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. स्वतःचा बचाव करण्यासाठी काळवीटाच्या जलद प्रतिसादाने वापरकर्ते थक्क झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी त्या शिंगांचा वापर कधीच पाहिला नाही, आता समजला आहे.’ तर एक म्हणाला, ‘हेच कारण आहे की काळवीटाची शिंगे डोक्यावर संरक्षणासाठी विकसित झाली आहेत.’