सोशल मीडियावर कधीकधी काहीतरी विचित्र असे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही प्राणी अतिशय विचित्र असतात आणि इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात, यात शंका नाही. इतरांपेक्षा वेगळे असल्याने त्यांचे फोटो आणि व्हिडीओ वेगात व्हायरल होत असतात. कधी कधी आपल्याला असे विचित्र प्राणी भेटतात, ज्याची आपण कल्पनाही करत नाही. सध्या असाच एक प्राणी सोशल मीडियावर चर्चेत आहे. समुद्रात पाण्याखालून एक मासा चोरून पाहत असताानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रात निळसर पाणी वाहताना दिसत आहे. या निखळ पाण्यात विचित्र जीव असल्याचं दिसून येतंय. काही वेळासाठी तो पाण्यातला दगड असल्याचा भास होतो. पण काही वेळाने लक्षात येतं की, पाण्यात राहून माश्यासारखा दिसणारा एक प्राणी डोकावून पाहताना दिसत आहे. यात त्याचे मोठे डोळे स्पष्टपणे दिसून येत आहेत. एक महिला व्हिडीओ काढताना दिसतेय. पाण्यात कुणीतरी आपल्या डोकावून बघतंय असं जाणवल्यानंतर ही महिला त्या प्राण्यावर कॅमेरा झूम करते. त्यानंतर या प्राण्याचा भलामोठा डोळा पाहून काही वेळासाठी मनात भीती वाटू लागते. हा प्राणी आता हल्ला करतो की काय, असं वाटू लागतं.
आणखी वाचा : VIRAL: बाईकवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, लोकांनी विचारले, “ऑफिसचे काम महत्वाचे आहे की जीवन?”
हा व्हिडीओ निरखून पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा माश्यासारखा दिसणारा प्राणी दुसरा तिसरा कुणी नसून व्हेल मासा आहे. हा राखाडी रंगाचा व्हेल मासा महिलेच्या नजरेला नजर लावून डोकावताना दिसत आहे. हा व्हिडीओ मेक्सिकोचा आहे. या व्हेल माश्याला महिला ‘हॅलो’ बोलताना दिसून येत आहे. व्हेल शांतपणे तिच्याकडे पाहतो आणि काही क्षणांनंतर पाण्यात निघून जातो.
आणखी वाचा : माणसांप्रमाणेच माकडांनाही स्मार्टफोनचे वेड, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : “लग्नानंतर दररोज साडी घालावी लागेल!” आसामच्या जोडप्याचा लग्नासाठी अनोखा करार
हा व्हिडीओ वायरल हॉग नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.