आकाश अनंत आहे. त्याला कशातच मोजता येत नाहीत. ते किती मोठे आहे याची ठोस कल्पना आजवर कुणालाच नव्हती. आपलं हे ब्रम्हांड, याचं Origin काय, किंवा यात नेमकं काय काय आहे अशा सर्व गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. ब्रम्हांड कसं दिसत असेल, असा प्रश्न एकदा तरी तुम्हाला पडला असेलच. याचं उत्तर वैज्ञानिक आजही शोधत आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती ब्रम्हांडात कशी दिसत असेल, तसंच पृथ्वीच्याही पलिकडे ब्रम्हांडात आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी असतील, असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडतच असतील. मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ केवळ कम्प्यूटरवर तयार केलेल्या ग्राफिक्सची कमाल आहे. एकाही वैज्ञानिकाला अद्याप अवकाशातील रहस्ये कळू शकलेली नाहीत किंवा ते संपूर्ण विश्वाचा शोध घेऊ शकले नाहीत. त्यामुळे फक्त अंदाज म्हणून व्हिडीओ आपण पाहू शकतो. हा व्हिडीओ संपूर्ण सत्य नाही. कारण शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे सत्य यापेक्षा खूप विस्तृत आहे. आपण ज्या व्हिडीओवर चर्चा करत आहोत त्यामध्ये सुरुवातीला प्रश्न विचारण्यात येतो की विश्व किती मोठे आहे? यावर प्रत्येकजण आपआपल्या ज्ञानावर आधारित उत्तरे देईल. पण हा व्हिडीओ तुम्हाला आपण राहत असलेल्या पृथ्वीपासून ते ब्रम्हांडापर्यंतचा सुंदर अनुभव देईल.

आणखी वाचा : इवल्याश्या कासवांनी या VIRAL VIDEO तून दिला आयुष्यातला सर्वात मोठा धडा

यात एक मुलगी जमिनीवर दिसते आणि नंतर कॅमेरा हळुहळू झूम आउट होऊ लागतो. हळूहळू व्हिडीओची व्याप्ती वाढते आणि ब्रह्मांड एका लहान चेंडूसारखे दिसते. पृथ्वी हळुहळू लहान होते आणि नंतर सूर्यमाला, आकाशगंगा आणि लाखो आकाशगंगा असा डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रवास या व्हिडीओच्या माध्यामातून अनुभवता येतो. पण इथे फक्त गोल नाही, त्याच्यासोबत पुन्हा करोडो गोल दिसू लागतात, यावरून असे दिसून येते की विश्वात एकच विश्व नाही तर करोडो विश्व आहेत. म्हणूनच या संकल्पनेला ‘मल्टीव्हर्स’ म्हणतात.

आणखी वाचा : OMG! वॉशिंग मशीनमध्ये घुसली मांजर, गोल गोल फिरत राहिली आणि…. पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हिडीओ :

आणखी वाचा : ब्लडप्रेशरच्या मशीनने शुगर तपासलं, ‘साथ निभाना साथिया’ मालिकेचा हा सीन होतोय VIRAL, मीम्सचा पाऊस

अॅस्ट्रॉनॉमी व्ह्यूज नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून एका व्यक्तीला विश्वास बसला नाही आणि त्याने प्रश्न उपस्थित केला की हे “विश्व इतके मोठे आहे हे मानवाला कसे कळले.” त्यांच्या या कमेंटवर कुणी म्हटलं की, माणसांनी कल्पना केली तर कुणी म्हटलं की हे विज्ञान, गणित आणि अवकाशातील संशोधनातून कळलं. एका व्यक्तीने सांगितले की इतर आकाशगंगेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो खूप उत्सुक आहे.

Story img Loader