सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. सोशल मीडियाच्या लाखो वापरकर्त्यांनी या फोटोमध्ये नक्की किती घोडे आहेत हे सांगायचा प्रयत्न केला तरी केवळ कोणीतरी जाणकारच हे कोडं सोडविण्यास सक्षम असेल. तुम्ही सांगू शकता या फोटोमध्ये किती घोडे आहेत? पिंटो असे या चित्राचे नाव असून, बेव्ह डूलिटलने तयार केले आहे.

तुम्हाला किती घोडे दिसत आहेत?

(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)

हा फोटो अमेरिकन साइट किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थने (Kids Environment Kids Health) अपलोड केला आणि विचारलं की त्यात किती घोडे आहेत? आता तुम्ही म्हणालं की यात काय अवघड आहे? अनेकांना यात पाच घोडे असल्याचं दिसत आहे. पण हे चुकीचे उत्तर आहे.

(हे ही वाचा: Shani Gochar 2022: नवीन वर्षात ‘या’ राशींवर होऊ शकते शनिदेवाची कृपा!)

नक्की किती घोडे आहेत?

‘किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थ’नुसार या चित्रात ४-५ नव्हे तर ७ घोडे लपलेले आहेत. तथापि, सर्वाना ५ घोडे स्पष्टपणे दिसत आहेत, तर दोन कुठेही दिसत नाहीत! वास्तविक, दोन घोड्यांपैकी एकाचे डोके दिसते आणि एकाचे शरीर. फोटोत असे ७ घोडे आहेत.

Story img Loader