आईसलँड पर्यटन संस्थेने गुरुवारी देशाचा एक प्रचारात्मक व्हिडीओ जारी केला आहे ज्यात मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गचे थेट विडंबन केले आहे.व्हिडीओमध्ये झुकेरबर्गसारखा दिसणारा – “झॅक मॉसबर्गसन” नावाचा – फेसबुक त्याचे नाव बदलून मेटा करत असल्याच्या झुकेरबर्गने गेल्या महिन्याच्या अखेरीस केलेल्या घोषणेवर गंमत केली. “हॅलो आणि या नैसर्गिक वातावरणात आपले स्वागत आहे,” प्रस्तुतकर्ता म्हणतो.
“आज मला खूप विचित्र न होता आपल्या जगाशी जोडण्यासाठी क्रांतिकारक दृष्टिकोनाबद्दल बोलायचे आहे,” तो पुढे म्हणाला. झुकेरबर्ग सारखा दिसणारा नंतर “आइसलँडव्हर्स” सादर करतो, जे झुकरबर्गच्या मेटाव्हर्स महत्वाकांक्षेचे स्पष्ट विडंबन आहे.
कोणी बनवला व्हिडीओ?
आईसलँड आणि त्याच्या उत्पादनांचा प्रचार करणार्या सार्वजनिक-खाजगी संस्था, इंस्प्राइड बाय आइसलँड (Inspired by Iceland) द्वारे व्हिडीओची निर्मिती केली आहे.मेटाव्हर्स हा शब्द विज्ञान-कथेतून घेतलेला शब्द आहे, आणि इंटरनेटच्या भविष्यातील आवृत्तीचा (version ) संदर्भ देतो ज्यामध्ये लोक आभासी आणि संवर्धित वास्तवाद्वारे प्रवेश करतात. झुकेरबर्गने गेल्या महिन्यात रीब्रँडच्या घोषणेदरम्यान म्हटले होते की त्याला मेटा “फेसबुक प्रथम नव्हे तर प्रथम मेटाव्हर्स” बनवायचे आहे.
( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )
आइसलँड जाहिरातीतील प्रस्तुतकर्ता “मूर्ख दिसणार्या हेडसेटशिवाय खरी वास्तविकता (actual reality) ” असे आईसलँडवरचे वर्णन करतो.
( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आलं हसू )
जुन्या फोटोवरही विनोद
व्हिडीओमध्ये झुकेरबर्गच्या वैयक्तिक आयुष्यातील एका क्षणाचे विडंबनही करण्यात आले आहे, एका क्षणी प्रस्तुतकर्त्याने सनस्क्रीनचा मुखवटा घालून झुकेरबर्गचा सुट्टीवर फोटो काढला होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निळा चिखल पसरला होता.