RRR In comic format: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला. याआधी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यासह अन्य पुरस्कार सोहळ्यांमध्येही या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मार्च २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राजामौली यांचे दिग्दर्शन आणि ज्यूनियर एनटीआर-रामचरण यांचा अभिनय यांच्या बळावर या चित्रपटाने प्रेक्षकांनी मने जिंकली. भारतसह जगभरामधील चित्रपटप्रेमींना या चित्रपटाने वेड लावले. आरआरआरला ऑस्कर मिळाल्यानंतर या चित्रपटाची लोकप्रियता अधिक वाढली.
हा चित्रपट इंग्लंड, अमेरिका, जपान अशा काही देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. खुद्द एटीआर आणि रामचरण जपानमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते. तेथे या सुपरस्टार्सची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अशातच एका जपानी फॅनने आरआरआरची कथा कॉमिक बुक माध्यमामध्ये उतरवली आहे. या कॉमिक बुकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंन्स्टाग्रामवर Roar of RRR या फॅन पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जपानमधील एका महिला फॅनने आरआरआरचे कॉमिक बुक तयार केले आहे. तिचा मुलगा ७ वर्षाचा आहे. या वयामध्ये त्याला ३ तासांचा चित्रपट सबटायटल्ससह पाहणे शक्य होणार नसल्याने तिने ही शक्कल लढवली आहे. असे लिहिले आहे. या व्हायरल व्हिडीओखाली कमेंट करत नेटकऱ्यांनी जपानी फॅनच्या कलेचे कौतुक केले आहे. तिच्या या कलेयामार्फत भारतीय आणि जपानी संस्कृतीचा अजब संगम पाहायला मिळत आहे.