Jugaad Video: सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सोशल मीडिया व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही अतरंगी जुगाड देखील पाहायला मिळतात. कधी कोणी कारपासून हेलीकॉप्टर तयार करू शकते तर कोणी विटेपासून कूलर तयार करते…..सर्वकाही जुगाड करून. आता असाच एक जुगाड सध्या चर्चेत आला आहे जो पाहिल्यानंतर प्रत्येक जण थक्क झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने जुगाड वापरून असे काही झाले आहे जे पाहून लोक हैरान झाले आहे आणि हे देखील सत्य आहे की अशा कल्पना लोकांच्या मनात येतात कुठून.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्वचितच कोणी असेल ज्याला आईस्क्रीम खायला आवडत नाही. जेव्हा आइसक्रीम खाण्याची इच्छा होते तेव्हा लोक पटकन बाहेर जातात आणि आईस्क्रीम खाऊन येतात. आता लोक ऑनलाईन ऑर्डर करून देखील त्वरित आईस्क्रीम मागवू शकतात किंवा बाहेर जाऊ आईस्क्रीम घेऊ येतात. कित्येक लोक जास्तीचे आईस्क्रीम आणून फ्रिजमध्ये ठेवतात जेणेकरून जेव्हाही इच्छा होईल तेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकतील. खूप कमी लोक असतील जे कदाचित घरी आईस्क्रीमतयार करत असतील कारण हे तयार करण्याची प्रक्रिया फार मोठी आहे आणि यासाठी जास्त सामान लागते. एवढे व्याप करण्यापेक्षा विकत आणून आईस्क्रीमखाणे केव्हाही परवडते.

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! ढाब्याच्या जेवणात एका व्यक्तीला सापडला मेलेला उंदीर, धक्कादायक Video Viral

पण लोकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जे पाहून तुम्हाला समजले कोणतेही व्याप करता आईस्क्रीम कसे तयार करावे. हा व्हिडिओ ट्विटरवर @pareekhjain नावाच्या यूजरने शेअर केला आहे. व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आउटडोअर आईस्क्रीम तयार करण्याची विचित्र पद्धत!

हेही वाचा – विदेशी फ्रेंड्सचा देशी अवतार! FRIENDS भारतात शूट झाली असती तर? भारतीय लग्नात कसे दिसले असते सर्व पात्र; पाहा AI फोटो

१ मिनिट ३९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की. एक व्यकी गाडीच्या टायरमध्ये लावलेला थर्मल फ्लास्क काढतो. त्याच्या आतील स्टीलचा डब्बा काढून त्यात दूध, अंडे, ओरिओ बिस्कीट आणि साखर टाकतो. मग स्टर कंटेनर पुन्हा ऑरेंज बॉक्समध्येटाकून बर्फ, आईसक्रिम सॉल्टने झाकतो. त्यानंतर गाडी काही वेळ फिरवतो आणि आईस्क्रीम तयार होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral jugaad video man make ice cream outdoor by using car tyre snk