Viral video: सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोज काहीतरी नवीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतं. त्यामुळे नेटकरीही जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतीत करत असतात. अनेक मजेशीर, विचित्र, धोकादायक, भयानक, भावुक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सामना क्रिकेटचा असो, फुटबॉलचा असो वा अन्य दुसऱ्या कुठल्याही खेळाचा. काही वेळेस स्पर्धा इतकी रंगते की खेळाडूंसोबत प्रेक्षक देखील आपला ताबा सोडू लागतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खदखदून हसवणारे असतात, तर काही व्हिडिओ पाहून आपला प्रेरणा मिळत असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कबड्डी हा मैदानी खेळ आहे. यात चपळतेसह ताकदीचीही तितकीच गरज असते. मात्र हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे. तसेच त्या खेळाडूंचं कौतुक देखील केलं जात आहे. या खेळाडूंनी दाखवून दिलं आहे की, कबड्डी हा जितका ताकदीचा खेळ आहे तितकाच बुद्धीचाही खेळ आहे.
सगळं संपूनही डाव जिंकता येतो
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कबड्डीचा सामना सुरु असतो. चढाईपटू चढाई करण्यासाठी सज्ज होतो. तुम्ही पाहू शकता की समोरच्या टीमने चढाईपटूची पकड केली, मात्र तो इतका चपळ आहे की, तो तीन ते चार वेळा त्यांच्या तावडीतून सुटून त्यांना चकवा देऊन अखेर आऊट करुन आपल्या हद्दीत परततो. खेळाडूचा हा चलाखपणा, हुशारी आणि शेवट प्रर्यंत केलेले प्रयत्न पाहून सगळेच थक्क झाले. सगळं संपूनही डाव जिंकता येतो हे या तरुणानं दाखवून दिलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> चक्क पल्सर बाईकला बसवलं ट्रॅक्टरचं चाक; देसी जुगाडाचा अनोखा VIDEO पाहून डोकंच धराल
हा व्हिडीओ aathavn_premachi_ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते.