या जगात सुखाचे मोजमाप नाही. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठा आनंद देऊन जातो. असं म्हणतात की, आनंदी राहणं हे व्यक्तीवर अवलंबून असतं. काही व्यक्तींकडे सारं काही असूनही ते दुःखीच राहतात आणि अगदी छोटीशी गोष्ट मिळाली तरीही त्यात खूप मोठा आनंद होत असतो. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्यामध्ये सकारात्मकता येईल आणि तुम्हाला कितीही अवघड परिस्थितीत आनंदी कसं राहायचं हे देखील शिकायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ EB30X Fitness Studio या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून कुणाला तरी वाटेल की यात अश्रू ढाळण्यासारखं काय आहे, पण जे लोक हा व्हायरल व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल दिसत आहे ज्याला हात नाही. एक डॉक्टर या मुलाला प्रोस्थेटिक हात लावताना दिसून येत आहेत.

डॉक्टरांनी मुलावर बनावट हात लावला
हा लहान मुलगा व्हीलचेअरवर बसला आहे आणि डॉक्टर त्याच्या कापलेल्या हातावर बनावट हात लावताना दिसत आहेत. हे पाहून या मुलाच्या आनंद गगनाला भिडतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. डॉक्टरांनी हे बनावट हात लावल्यानंतर मुलाचे दोन्ही हात समोर ठेवताच तो आनंदाने डोलायला लागतो. तो आपल्या खऱ्या हाताने बनावट हाताला स्पर्श करतो आणि इतक्या जोरात हसतो की त्याचं हसणे पाहून अनेकांना आपलं मोठे दु:ख अगदी लहान झाल्यासारखं वाटतं.

आणखी वाचा : लग्नाआधी मित्राने नवरीला विचारलं, “तुला कसं वाटतंय?” मिळालं हे उत्तर, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय ‘फायर पाणीपुरी’चा VIRAL VIDEO, पाहून तुम्ही व्हाल हैराण!

फेसबुकवर व्हिडीओ होतोय व्हिडीओ
या व्हिडीओला ७३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांनी याला लाइक केलं आहे आणि हजारो लोकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. लोकांच्या भावनिक कमेंट्स वाचल्यानंतर हा व्हिडीओ जवळपास सर्वांच्याच मनाला भिडल्याचं दिसतंय. त्याच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य पाहून प्रत्येकजण मुलाला आशीर्वाद देत आहे. एका युजरने कमेंट केलीय की, “मला आनंद आहे की मुलाला हात मिळाला आणि आमच्या मुलांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा मला अभिमान आहे.”