लहानपणी शाळेत केलेली मैत्री खूप खास असते. कधी कधी शाळेतील मित्र आयुष्यभर एकत्र राहतात. तर कधी कधी अशी वेळ येते की काही कारणास्तव आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. पण अशा प्रसंगीही मैत्री तुटत नाही. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे ज्यामध्ये एक मूल त्याच्या जुन्या शाळेत जातो आणि तिथे त्याच्या जुन्या मित्रांना भेटतो. म्हणायला ती सगळी मुलं आहेत, पण त्यांच्यातील प्रेम पाहून, मोठ्यांप्रमाणे एकमेकांना भेटल्यावर भावूक झाले आहेत.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल त्याच्या जुन्या शाळकरी मित्रांना भेटताना दिसत आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, केसन नावाचा मुलगा जेव्हा त्याच्या पालकांसह दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला तेव्हा त्याला शाळेचा निरोप घ्यावा लागला. तो दुसऱ्याच शाळेत शिकत आहे. पण जेव्हा जुन्या शाळेतील शिक्षकाने सांगितले की त्या वर्गातील मुलांचा आज शेवटचा दिवस आहे यावेळी केसननेही हजेरी लावावी अशी त्यांची इच्छा आहे, तेव्हा त्याचे पालक त्याला जुन्या शाळेत घेऊन जातात.
मैत्रीला वय नसतं !
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलाने वर्गात प्रवेश करताच तिथे उपस्थित सर्व मुले त्याला पाहून खूप आनंदित झाली. केसनलाही आनंद झाला. मुलांनी त्याला मिठी मारली आणि दरम्यान सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. मैत्रीच्या आठवणीने एवढी लहान मुलंही रडू शकतात, हे पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सगळी मुलं त्याच्या आजूबाजूला उभी राहतात आणि त्याला एक एक करून मिठी मारू लागतात. यानंतर, शिक्षकांच्या सांगण्यावरून, सर्व मुले एका रांगेत उभे राहतात आणि मुलाला एक-एक करून मिठी मारू लागतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – भर उन्हात मालकाला कष्ट करताना पाहून कुत्र्यानं उचलला खारीचा वाटा! Video पाहून कराल कौतुक
हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आणि अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.