स्वयंपाकघरात काम करणे वाटते तितके सोपे नुसते. फक्त चांगला स्वयंपाक केला म्हणजे झालं असे नाही. स्वंयपाकासाठी कोणती भांडी वापरायची पासून ही भांडी कशी साफ करायची पर्यंत अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. भांड्यांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते कारण आपले रोजचे अन्न आपण त्यामध्ये शिजवते. तवा साफ करणे देखील फार कष्टाचे काम आहे. लोखंडी तवा असेल तर तारेच्या घासणीने जो देऊन घासल्याशिवाय चमक येत नाही आणि नॉन स्टिक तवा असेल तर फार जोर न देता, तारेची घासणी न वापरत तवा साफ करणे म्हणजे किचकट काम होऊन जाते.

स्वयंपाक करताना आजकाल नॉन स्टिक तवा सर्रास वापरला जातो. डोसा करण्यासाठी या तव्याला विशेष पसंती दिली जाते कारण त्यावर डोसा चिकटत नाही. अनेकदा तवा वापरल्यानंतर त्यावर एक काळपट थर जमा होतो. तवा तापवल्यानंतर त्यात मुरलेले तेल बाहेर येऊ लागते. अशास्थितीमध्ये कितीही घासले तरी तेलकटपणा जात नाही. काळजी करू नका आमच्याकडे तुमच्या या समस्येसाठी उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून तुम्ही तवा नव्यासारखा चकचकीत होऊ शकतो.

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gas leak during excavation in Vasai Agarwal Nagari
वसई: खोदकाम करताना गॅस गळती, रहिवाशांमध्ये घबराट
Safety demonstration at fuel storage depot in Miraj sangli news
मिरजेतील इंधन साठवण आगारात सुरक्षा प्रात्यक्षिक
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
Sabudana Kichadi
साबुदाना खिचडी चिकट होते? ढोकळा लालसर होतो अन् कढी फुटते…रोजचा स्वयंपाक करताना वापरा या टिप्स, तासाचे काम झटक्यात होईल पूर्ण

हेही वाचा – पाणी वापरून बनवा तूप! विश्वास बसत नाहीये मग ‘ही’ सोपी ट्रिक एकदा वापरून बघा; पाहा Viral Video

तव्यावरील तेलकटपणा आणि काळपट थर साफ न केल्यास आपल्या पोटात जाऊ शकतात अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तवा व्यवस्थित साफ करणे आवश्यक आहे. तुम्हाला फार काही करायचे नाही. तुमचा नॉनस्टिक तवा गॅसवर गरम करायाला ठेवा. थोडासा कपड्याचा साबण किसून सर्वत्र पसरवा. त्यानंतर त्यात दोन चमचे बेसनपीठ त्यावर टाकून एकत्र करा. बेसनपीठ लालसर होईल पर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून चमच्याने घासून घ्या. त्यामध्ये तव्याचा तेलकटपणा आणि काळपटपणा निघून जाईल. तवा स्वच्छ पाण्याने साफ करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त ५ मिनिटे लागतील. तुम्ही फार कमी वेळात तवा अगदी चकचकीत करू शकता.

इंस्टाग्रामवर misscrafty20 नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लोकांना ही सोपी ट्रिक आवडली आहे. ही ट्रिक उपयुक्त आहे की नाही हे तुम्ही स्वत: वापरून ठरवू शकता.

Story img Loader