Lion viral video: जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सिंह एक आहे. शिकारीच्या बाबतीत तर सिंह खूपच तत्पर आणि धोकादायक आहे. तो त्याची शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात त्याच्याविषयी दहशत आहे. एकदा का प्राणी त्यांच्या तावडीत आला की त्यातून सुटणे अवघडच नाही तर अशक्यही होते. सिंहाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता एक नवीन व्हिडिओ आला आहे, मित्र किती मस्तीखोर असतात हे आपल्याला माहितीच आहे. मात्र या मित्रांनी मस्तीची मर्यादाच ओंलाडली असून आपल्या मित्राला चक्क बंद खोलीत सिंहिणीसोबत सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बंद खोली सिंहाला ठेवलं आहे. काही तरुण या सिंहाला पाहत असताना, त्या खोलीत जातात तेव्हा सिंह त्या दोन्ही तरुणांच्या अंगावर उड्या मारतो. त्यातील एक तरुण सिंहाला अजिबात घाबरत नाहीये तर एक तरुण सिंहाला पाहून पुरता घाबरला आहे. या तरुणाला त्याच्या मित्रांनी मुद्दाम त्या खोलीमध्ये ढकललं होतं. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे खोलीत आणखी दोन लोक उपस्थित होते. दोघेही तरुण हसतानाचा व्हिडिओ शूट करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – गुजरातमध्ये मिळतेय विचित्र पाणीपुरी, बटाट्याऐवजी टाकला ‘हा’ पदार्थ, Video बघून म्हणाल नको बाबा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देत असून या तरुणाच्या मित्रांच्या कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral lioness and boy closed in one room shocking video viral n social media trending video srk