Viral Liquor Shop Poster: आताच्या काळात सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा अंदाज नाही. पण, कधी कधी या व्हायरल गोष्टींमुळे अनेक मजेशीर वाटणाऱ्या गोष्टींना गंभीर रूपदेखील असतं याची जाणीव होते. आपण रस्त्यावर जाहिरातींचे अनेक पोस्टर्स पाहतो; पण काही विशिष्ट पोस्टर्स आपल्याला अगदी आवर्जून लक्षात राहतात. त्यामागचं कारणही तसंच असतं. आता अशाच एका जाहिरातीच्या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील दारूच्या दुकानाजवळील एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. या पोस्टरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय तसंच त्यावर टीकाही झाली आहे. नेमकं या पोस्टरवर असं आहे तरी काय? जाणून घेऊ.

PETA India sends a letter to Salman Khan
Bigg Boss 18: सलमान खानच्या राशीला गाढवाचे ग्रहण, पेटाकडून पत्र; नेमकं काय घडलंय? पेटा संस्था काय काम करते?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ratan Tata funeral police crying front of Shantanu naidu emotional Photos goes viral on social media
खाकीलाही जेव्हा रडू येतं! रतन टाटांच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनाही अश्रू अनावर; शेवटचा क्षण पाहून येईल अंगावर काटा
ankita walawalkar future husband arrange special surprise for her
‘कोकण हार्टेड गर्ल’ला होणाऱ्या नवऱ्याकडून मिळालं सुंदर Surprise! अंकिता फोटो शेअर करत म्हणाली, “केळवणाला सुरुवात…”
Pune Fc road viral video punekar and netizen support big boss suraj chavan want him to be winner showing poster on car
VIDEO: पुणेकरांनी बिग बॉसचा विजेता ठरवला! कारवर लावलं असं पोस्टर की पाहून सगळेच थांबू लागले; पाहा कोण होणार विजेता
Are you tired of cleaning the fridge
तुम्हालाही फ्रिज साफ करायचा कंटाळा येतो? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने फ्रिज राहील नेहमी फ्रेश
The recipe of the syrup was told by the boy
निरागस चिमुकला सरबत बनवण्याची रेसिपी सांगितल्यानंतर असं काही म्हणाला… ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आलं हसू
Bigg Boss Marathi Fame Arbaz Patel Dance on adnaan shaikh sangeet Ceremony video viral
Video: अरबाज पटेलचा ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यावर मित्राच्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स, शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकला, पाहा

व्हायरल पोस्टर (Viral Liquor Shop Poster)

व्हायरल झालेल्या या पोस्टरवर ‘ठेका’कडे (दारूच्या दुकानाकडे) बाण दाखवत, दुकानात जाऊन इंग्रजी बोलायला शिकाल, असा सल्ला दिला आहे. “दिन दहाडे इंग्लीश बोलना सीखे” म्हणजेच (दिवसाढवळ्या इंग्रजी बोलण्यास शिका), असं या पोस्टरवर लिहिलं गेलं आहे.

असं बोललं जातं की, दारूच्या प्रभावाखाली असताना विशेषतः भारतात लोकं इंग्रजीमध्ये बोलायाला लागतात. अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून वापरून लोकांना भुलवण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे व्हायरल पोस्टर मात्र स्थानिक लोकांमध्ये, विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा… शर्ट, लुंगी अन्…, शेतकरी तरुणीने भातशेती करता करता ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर केला भन्नाट डान्स; VIRAL VIDEO एकदा पाहाच

सिद्धार्थ कुमार या स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं या व्हायरल झालेल्या पोस्टरवर जोरदार टीका केली आणि सांगितलं की, याचा विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सिद्धार्थने इतर विद्यार्थ्यांसह, ते पोस्टर काढून टाकण्याची मागणी केली आणि या पोस्टरसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणीदेखील केली.

“अशा प्रकारच्या पोस्टर्सचा परिसरातील विद्यार्थी आणि तरुणांवर विपरीत परिणाम होईल. हे पोस्टर कोणी लावले हे प्रशासनाने शोधून त्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी आमची इच्छा आहे. पोस्टर तत्काळ उतरवण्यात यावं,” असं सिद्धार्थचं म्हणाणं आहे.

हेही वाचा… शिवीगाळ केली अन्…., बिहारमधील ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून व्हाल थक्क

दारू प्यायल्यानंतर लोक इंग्रजी बोलायला शिकतील, असा संदेश या पोस्टमधून देण्यात आला आहे, जे चुकीचे आहे. तसेच, पोस्टरवर झटकन एक नजर टाकल्यास ते एखाद्या स्पोकन इंग्लिश कोचिंग सेंटरच्या जाहिरातीसारखं दिसतं,” असंही तो म्हणाला.

स्थानिकांच्या संतापाची दखल घेत जिल्हाधिकारी भाव्या मित्तल यांनी तत्काळ उत्पादन शुल्क विभागाला पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.