Viral Love Letter: सोशल मीडियावर आजवर प्रेमाची अनेक रूपं आपण पाहिली आहेत. काही अगदीच गोड तर काही अगदीच विचित्र, कसंही असलं तरी प्रत्येकासाठी आपलं प्रेम खास असतं. अशातच जर आपल्या प्रेमाचा माणूस आपल्यावर रुसला की त्याची मनधरणी करण्यासाठी आपणही वेगवेगळ्या प्रयत्नांची शर्थ लावतोच. प्रियकर- प्रेयसीचा रुसवा दूर करणारी प्रेम पत्र ही वर्षानुवर्षे परफेक्ट फंडा सिद्ध झाली आहेत. अशाच एका गर्लफ्रेंडने आपल्या रुसलेल्या बॉयफ्रेंडला लिहिलेलं प्रेमपत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एरवी सुद्धा कपल्स एकमेकांना काही ना काही टोपणनावांनी हाक मारतात पण या मुलीने अशी काही नावं वापरली आहेत की लोकांनी थेट तिला निब्बी टॅग देऊन टाकला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्रेम पत्र वाचून तुम्हीही लोटपोट व्हाल. जानू, राजा, फौजी, टमाटर, रसगुल्ला अशा टोपणनावाने ही प्रेमिका पत्र लिहायला सुरुवात करते. ती लिहिते, “जेव्हा तू एखाद्या मुलीशी बोलतोस तेव्हा माझं हृदय दुखावलं जातं. तू मुलींशी बोलू नको, त्यांना बघून हसू नको. मी तुला चुकीचं समजत नाहीये पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू कोणाच्याच घरी गेलेलं मला आवडत नाही, कबुतर, मला माफ कर. आय लव यू, आय लव यू, आय लव यू.” यापुढचा मजकूर तुम्ही स्वतःच या खाली दिलेल्या पोस्ट मध्ये वाचू शकता.

प्रेम की वेड?

हे ही वाचा<< ‘फुटूरे’ धोक्यात! शाळेतील बाईंचं इंग्रजी ऐकून लागेल वेड! Video मधील प्रत्येक शब्द ऐकताना पोट धरून हसाल

दरम्यान, आजपासून व्हॅलेन्टाईन वीक सुरु होत आहे. अशातच या निबाबी गर्लफ्रेंडचं प्रेम बघून नेटकऱ्यांना चांगलाच मीम कॉन्टेन्ट मिळाला आहे. या पत्रावर १४ हजाराहून अधिकांनी लाईक्स दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टखाली कमेंट्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल. म्हणूनच बरं झालं मी सिंगल आहे असं म्हणत काहींनी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी उपहासाने वाह कबुतर तू खूपच लकी आहेस असं म्हणत त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला चिडवलं आहे. दिवसभराच्या तणावात तुम्हीही थकून जात असाल अशावेळी या मजेशीर पत्राने तुमच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? कमेंट करून नक्की कळवा.