सिंह, वाघ, चित्ता किंवा इतर जंगली प्राण्यांना व्हिडिओमध्ये पाहिल्यावर आपण त्यांच्या प्रेमात पडतो, मात्र प्रत्यक्षात ते समोर आल्यावर भीतीने आपली हवा टाईट होते. पिंजऱ्यात बंदिस्त असूनही वाघ हा वाघ असतो, त्यामुळे त्याच्यापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. पण जेव्हा अतिहुशार लोक वाघाशी पंगा घेतात तेव्हा ते त्यांच्या चांगलंच अंगलट येतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वाघासोबत मजा करताना दिसत आहे. मात्र त्यानंतर वाघाने जे केले ते पाहून तुमचा थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस वाघाच्या पिंजऱ्यात हात घालताना दिसत आहे. सहसा वाघाजवळ जायची हिंमतही कोणी करत नाही, पण या व्यक्तीने स्टंटबाजी करत आपला हात चक्क वाघाच्या पिंजऱ्यात घातला. हे दृश्य प्राणीसंग्रहालयाचे असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वाघ पिंजऱ्यात बंद आहे. बाहेर एक व्यक्ती त्याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. तो वारंवार पिंजऱ्यात हात घालतो. सुरुवातीला वाघ इकडे-तिकडे चालायला लागतो, पण नंतर काही वेळ ती व्यक्ती हात बाहेर काढत नाही, तेव्हा तो आधी हात फिरवतो आणि हात तोंडाने पकडतो.

दरम्यान तो हात चावायला लागतो आणि ती व्यक्ती, व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीसोबत घाबरून ओरडू लागते आणि तोंडातून हात काढू लागते. मात्र अखेर त्या व्यक्तीचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू होतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: प्रसिद्धीसाठी काहीही! तरुणाने २ मुठी भरुन कच्चा मिरच्या खाल्ल्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

@wildlifeanimall या Instagram अकाउंटवरुन अनेकदा विचित्र व्हिडिओ पोस्ट केले जातात. या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही वाघाला पाहायला गेलात जरी तो पिंजऱ्यात असला तरी त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखा. कारण भलते धाडस जीवावर बेतू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral man insert hand in tiger cage tiger eat man hand tiger attack man from cage viral video on social media srk