92 Year Old Passport Viral: जुन्या आठवणींचा ठेवा हा अमूल्य मानला जातो. वेळेच्या चक्रात आपण किती बदललो आहे हे सांगण्यासाठी अनेक फोटो, जुनी कागदपत्र दाखले देत असतात. सोशल मीडियावर अनेकदा या आठवणी शेअर केल्या जातात. अशाच एका युजरने अलीकडेच आपल्या आजोबांच्या ९२ वर्ष जुन्या पासपोर्टचा फोटो शेअर केला आहे. या पासपोर्टमध्ये लिहिलेला तपशील वाचून नेटकऱ्यांना फार अप्रूप वाटत आहे. आपण पाहू शकता की हा एक ब्रिटिश- इंडियन पासपोर्ट आहे जो तत्कालीन भारताचा भाग असलेल्या लाहोरमध्ये जारी करण्यात आला होता.
अंशुमन सिंग यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ब्रिटिश भारतीय सरकारने जारी केलेल्या पासपोर्टचे अनेक फोटो आहेत. १९३१ मध्ये ते ३१ वर्षांचे असताना हा पासपोर्ट जारी करण्यात आला होता. पासपोर्टच्या मुखपृष्ठावर ब्रिटीश सरकारचा अधिकृत शिक्का आहे तसेच हा पासपोर्ट असल्यास ती व्यक्ती केनिया सहित भारताच्या वसाहतीत प्रवास करू शकते असे नमूद करण्यात आले आहे.
९२ वर्ष जुना पासपोर्ट
दरम्यान या पोस्टला १ लाख ३४ हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत तर यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचवेळी रिम्पी बर्गामो नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या आजोबांच्या पासपोर्टचे फोटो देखील शेअर केले आहेत. यावर आपण पाहू शकता की रिम्पीच्या आजोबांच्या पासपोर्टवर इटली, नेदरलँड, जर्मनी, बॉम्बे येथून व्हिसाचे शिक्के होते.
हे ही वाचा<< Video: ९८ वर्षीय कैद्याच्या तुरुंगातून सुटकेचा व्हिडीओ का होतोय व्हायरल?
अनेकांनी या पोस्टवर कमेंट करून हा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे याला जपून ठेवा असा सल्ला दिला आहे. तुमच्याकडेही असा संग्रह आहे का? आणि हे फोटो तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा.