ऐन गणेशोत्सवात मुंबईला पावसाने झोडपले आहे. मुंबईमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवार सकाळपासूनच वाढल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील शीव, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांमध्ये रुळावर पाणी साठल्याने ठाणे ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर हार्बर मार्गावरही ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्ग वगळता इतर सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ठप्प झाली असून अनेक प्रवाशी अडकून पडले आहेत. तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. असे असतानाच ट्विटवरही मुंबईच्या पावसाचीच चर्चा आहे. अनेकांनी पावसाचे अपडेट्स, व्हिडिओ आणि फोटो #MumbaiRains आणि #MumbaiRain हे हॅशटॅग वापरून शेअर करताना दिसत आहेत. एकीकडे ट्विटवरुन चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे काहीजणांनी हे हॅशटॅग वापरून मुंबईकरांच्या व्यथा मिम्सच्या माध्यमातून मांडल्या आहेत. यात अगदी पावसात ऑफिसला येणारे कर्मचारी, गणेशोत्सव आणि पावसाचा संबंध असे अनेक ट्विटस व्हायरल झाले आहेत. पाहूयात असे काही व्हायरल मिम्स
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा