मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे भारतातील पहिले ५-स्टार हॉटेल असून, १९०३ साली त्याची स्थापना झाली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या हॉटेलची भव्यता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय तरुण अदनान पठाण यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदनानच्या व्हिडिओला २० मिलियनहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.
व्हिडाओच्या सुरुवातीला तो ताज हॉटेलच्या बाहेर उभा राहून, चहा पिण्यासाठी आत जाणार आहे असे सांगतो. व्हिडीओमध्ये पठाण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अनेक नामवंत व्यक्तींचे फोटो लावलेली भिंत आणि हॉटेलची आकर्षक सजावट दाखवतो. तो म्हणतो की,”ताज आतून इतका सुंदर आहे की, मला मी राजवाड्यात असल्यासारखे वाटले”
अदनानने तिथे Bom Hi-Tea ऑर्डर केली, ज्याची किंमत रु. १८०० असून कारसह एकूण रक्कम रु. २१२४ झाली. या हाय-टीमध्ये वडापाव, ग्रिल सँडविच, काजू कतली, खारी पफ, बटर आणि चहा यांचा समावेश होता. चहाची चव साधारण असल्याचे नमूद करत तो चहाला १० पैकी ५ गुण देतो. तुम्ही आयुष्यात एकदा तरी हा अनुभव नक्कीच घ्यावा” असे सांगून तो व्हिडिओ संपवतो.
हेही वाचा – “जीवाची पर्वाच नाही!”, भररस्त्यात धावत्या दुचाकीवर अल्पवयीन मुलासह तरुणांचा जीवघेणा स्टंट, Video Viral
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडिओवर कमेंट करत एकाने म्हटले की, “मी मुंबईत राहत असूनही ताजमध्ये कधी गेलो नाही,” तर दुसऱ्याने म्हटले, “अखेरीस कोणाचे तरी स्वप्न पूर्ण झाले.” दुसऱ्याने टोमणा मारला, “५-स्टार हॉटेलसाठी १० पैकी ५ गुण देणे हे थोडे वैयक्तिक मत होते.” आणखी एकजण म्हणाला की, “एवढ्या पैशात महिनाभर नाश्ता करू.”
हेही वाचा –एका सेकंदाच्या फरकाने जीव वाचला! भर रस्त्यात अचानक दरड कोसळली, अंगावर काटा आणणारा VIDEO Viral
u
u
ताज हॉटेल हे केवळ आलिशान सोयींसाठीच नव्हे, तर ऐतिहासिक वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. त्याची भव्य रचना, समुद्राकाठची जागा आणि जागतिक दर्जाची सेवा यामुळे ते जगभरात ओळखले जाते. अशा ठिकाणी अनुभव घेणे हे अनेकांसाठी स्वप्नपूर्ती ठरते.