मनात जर एखादी गोष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर ते काम करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. मग ते काम करण्यासाठी कितीही संकट आली तरी तुम्ही ती इच्छेच्या जोरावर पार करता. यासाठीच इच्छा तिथे मार्ग अशी म्हण आपल्याकडे वापरली जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळेल यात कसलीही शंका नाही. व्हिडिओमधील अपंग मुलाचा उत्साह पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- Video: रील बनवण्यासाठी रेल्वे लाईनच्या खांबावर चढण्याचा मोह नडला, क्षणात अंगातून धूर येऊ लागला अन्…

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात जे तुम्हाला नवीन काम करण्याची प्रेरणा देतात, तर काही व्हिडीओ अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहीत करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला शाररीक क्षमतांच्या पलिकडे जाऊन काही काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

हेही पाहा- रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका बिघडली, दुचाकीस्वारांनी १२ किमी ढकलत हॉस्पिटलपर्यंत नेली, पाहा Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही पायांनी अपंग असलेला एक चिमुरडा क्रिकेट खेळताना दिसत आहे. आपण सर्वांनी अनेकदा अपंग मुलांना त्यांच्या मित्रांना खेळताना पाहून निराश झाल्याचं पाहिलं आहे. कारण, ते अपंग असल्यामुळे त्यांच्या मित्रांप्रमाणे खेळू शकत नाहीत. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील लहान मूलगा आपल्या खेळण्याच्या इच्छाशक्तीने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही पायांनी अपंग असलेला हा एक मुलगा क्रिकेट खेळत आहे. शिवाय तो आपल्या इतर मित्रांप्रमाणे धावण्याचा प्रयत्नही करताना दिसतं आहे. या मुलाचा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले असून मुलाच्या जिद्दीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ @JaikyYadav16 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘यापेक्षा जास्त प्रेरणा देणारा व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर सापडणार नाही.’ हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अपंग मुलाचं खूप कौतुक केलं आहे. शिवाय हा मुलगा म्हणजे उर्जेच भांडार असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आत्तापर्यंत तो १ मिलियनहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.