Giant Snake Cave In Thailand: एखाद्या जुन्या गुहेच्या आत जायचे असेल भिती वाटतेच ना? वर्षानुवर्षे निर्जन असलेल्या त्या ठिकाणी सापासारखा भयानक प्राणी अचानक समोर आला तर…. असा विचारही पटकन मनात येतो . पण सध्या ट्विटरवर जी गुहा व्हायरल होत आहे ज्याची कल्पना तुम्ही कधी स्वप्तातही केली नसेल. तुमच्या कल्पनेपेक्षा भयानक अशी ही गुहा सध्या चर्चेत आहे. या गुहेच्या आत साप असेल की नाही हे सांगता येत नाही, पण गुहा पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या समोर एक प्रचंड आणि भयानक ॲनाकोंडा असल्याचा भास होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी पाहिली नसेल अशी अप्रतिम गुहा?

The Explained नावाच्या ट्विटर हँडलने या अद्भुत गुहेची काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहताक्षणी अस भास होतो की महाकाय ॲनाकोंडा साप समोर आला आहे. या गुहेचे तोंड फक्त मोठ्या सापासारखे नाही तर त्याच्या सभोवतालच्या खडकांचा आकार देखील सापाच्या त्वचेसारखा आहे.

हेही वाचा – भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी रस्त्यावर खरेदी केली भाजी: UPI पेमेंटचे झाले चाहते; व्हायरल होतोय व्हिडीओ

ट्विटर हँडलनुसार, ही गुहा थायलंडमध्ये आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेली भयानक गुहेची फोटो पाहून युजर्सना ॲनाकोंडाचा आठवतो आहे. हे फोटो आतापर्यंत ४०७०० लोकांनी पाहिला आहे.

हेही वाचा – झोपडपट्टी, खराब रस्ता अन् अस्वच्छतेच्या ठिकाणी लपलाय एक चेहरा, एकदा क्लिक करून नीट पाहा

गुहेबाबत आहेत अनेक समज

ही गुहा थायलंडच्या ईशान्य भागात बुएंग कान प्रांतात आहे. येथे स्थित नागा गुहा नावाच्या गुहा गटांपैकी एक आहे, जी खरोखरच सापासारखी दिसते. त्याच्या टेक्सचरमुळे, लेणीशी वेगवेगळ्या कथा देखील जोडल्या जातात. एखाद्या कथेनुसार किंवा मान्यतेनुसार, स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की या गुहेमुळे त्यांच्या परिसरात पुरेसा पाऊस पडतो. त्यामुळे येथील लोक या गुहेला शुभ मानतात. पण, या सर्व केवळ दंतकथा आहेत. त्यांचा कुठेही ठोस पुरावा नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral mysterious photos of a rock structure in thailand naga cave looks as a giant snake snk