Viral News Today: सोशल मीडिया सेन्सेशन सॉल्ट बे, उर्फ ​​नुसरेत गोके (Nusret Gökçe), हा हॉलीवूड स्टार्स, प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि इतर सेलिब्रिटींचा आवडता शेफ आहे. मागील काही वर्षांपासून त्याचे भाज्या कापतानाचे, रेसिपी बनवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, सॉल्ट बेचा पदार्थात मीठ टाकतानाचा एक फोटो आजही अनेक मीमर्सचा आवडता आहे. सॉल्ट बे आता अनेक फॅन्सी रेस्टॉरंट्समध्ये सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना भन्नाट मेजवान्या खाऊ घालण्यात व्यस्थ असतो. यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की सॉल्ट बेच्या हातचं जेवण चाखणं प्रत्येकाला परवडण्यासारखं नाही.

सॉल्ट बेची क्रेझ इतकी आहे की अनेकजण लाखो रुपये खर्च करून त्याच्या हातच्या रेसिपी चाखण्यासाठी जातात, अलीकडेच सॉल्ट बेने आपल्या अबू धाबीमधील नुसर-एट रेस्टॉरंटमधील एका ग्राहकाच्या बिलाचा फोटो शेअर केला होता. याला कॅप्शन देताना त्याने “क्वालिटी कधीही महाग नसते,” असे म्हंटले होते. एका अर्थी सॉल्टबेचं म्हणणं आपण खरं जरी मानलं तरी क्वालिटीची किंमत या बिलामध्ये चक्क १. ३६ कोटी रुपये असल्याचं दिसत आहे. या बिलातील एका एका पदार्थाचे भाव बघून नेटकरीही हादरून गेले आहेत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

तुम्ही बघू शकता की, बिलावरील सर्वात स्वस्त पदार्थ आहे फ्रेंच फ्राईज पण त्याचीच किंमत जवळपास ४००० डॉलर्स लावली आहे, या रक्कमेत वर्षभर पुरेल एवढं धान्य घरात आणता येईल अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. सॉल्ट बेच्या रेस्टॉरंटच्या वेबसाइटनुसार, अबू धाबी रेस्टॉरंटमधील स्टार्टर डिशची किंमत १९,००० रुपयांपासून पुढे सुरु होते. या हॉटेलमधील सोन्याच्या पानातील मांस शिजवण्याची पद्धत प्रसिद्ध आहे.

१ कोटीचं एवढं खाल्लं तरी काय?

हे ही वाचा>> Video: जंगलाचा राजा झाला भावुक; ७ वर्षांनी मालकीण दिसताच भल्यामोठ्या दोन सिंहांनी उडी घेतली अन..

नुसर-एटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल भरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, त्याच्या लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये काही ग्राहकांनी एका वेळेच्या जेवणासाठी तब्बल १८०० पौंड, म्हणजेच अंदाजे १.८० लाख रुपये भरले होते.

Story img Loader