आजच्या जगात एक रूपयाची किंमत ही हल्लीच्या लाखो, करोडोंच्या भावात तशी फारच कमी आहे. परंतु, आज या एक रूपयात कपडे खरेदी करता येणार आहे. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा सुरूय. एक रूपयाला कपडे मिळतात हे वाचून तुम्हाला कदाचीत आश्चर्य वाटेल. मात्र, हे सत्य आहे. ही किमया कॉलेजमधील चार तरूणांनी करून दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या देशात आजही अनेकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. बेघर, भिकारी आजही थंडीत रस्त्यावर रात्र काढत आहेत. याच वास्तवतेचे भान राखत बंगळुरूमधल्या चार मित्रांनी एकत्र येत एक कापड बँक सुरू केली आहे. इमॅजिन क्लोथ्स बँक असं या कापड बॅंकेचं नाव आहे. बंगळुरमधल्या इलेक्ट्रॉनिक्स सिटीमधील बेराटेना अग्रहारा इथल्या लावा कुशा लेआउटमधील दोन बेडरूमच्या छोट्या अपार्टमेंटमध्ये ही कापड बॅंक सुरू केलीय. आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांनाही मिळायला पाहिजे. या हेतूने गरजवंतांना मदत मिळावी हा उद्देश कल्पतरू तरूणांनी ठेवून केवळ एक रूपयात गरीबांना कपडे उपलब्ध करून दिले जात आहेत.

सर्वसामान्य ते उच्चभ्रू नागरिकांकडे जुने कपडे असतातच. पण त्याचा वापर होत नाही तर दुसरीकडे कपड्यांविना रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. हाच फरक ओळखून बंगळुर इथल्या मेलिशा नोरोन्हा, तिचा पती विनोद लोबो, आई ग्लॅडिस आणि तिचे दोन मित्र नितीन कुमार आणि विघ्नेश यांनी एकत्र येत करोना काळात गरिबांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये कापड बॅंक सुरू केली. या कापड बॅंकेतून हवे ते कपडे केवळ १ रूपयात खरेदी करता येणार आहेत. एक गरीब कुटुंबातील लोकांना अंगावर घालण्यासाठी कपडे मिळावेत म्हणून या हे सर्व तरूण वर्षाला सुमारे दोन हजार रुपये खर्च करत असतात. कापड बॅंकेतून कपड्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम सुद्धा हे तरूण गरीब कुटूंबातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी वापरणार आहेत.

या महाविद्यालयातीन तरूणांच्या अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरूय. तरूणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात आजुबाजुच्या परिसरातील जवळपास ३० अपार्टमेंटमधून जुने कपडे जमा होत आहेत. दान म्हणून मिळालेले कपडे स्वच्छ धुवून आणि इस्त्री करून ठेवलेले असतात. गरजूंचे नाव नोंदवल्यानंतर त्यांना ते सुपूर्द करण्यात येत असतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर नवीन कपडे खरेदी करताना घरातील जुने या बॅंकेत देणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. या कापड बॅंकेत साड्या, पॅन्ट, शर्ट, जॅकेट इत्यादींचा साठा करण्यात आला आहे. या कापड बॅंकेतील दोन कर्मचारी आकार, वय आणि प्रकारानुसार कपड्यांची व्यवस्था करत असतात.

आणखी वाचा : Viral Video: काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण नवरी भलतंच करत होती काम

या चार तरूणांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमामुळे गरजू आणि गरीब लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. ऐन थंडीच्या दिवसात तरूणांचा हा उपक्रम गरीबांना मायेची ऊब देणारा ठरलाय. विशेष म्हणजे, यातील विनोद आणि नितीन यांनी १८ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना कपड्यांची विक्री करण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांना ही कापड बॅंक सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हा ट्रेंड संपण्याचं नाव काही घेत नाही; ‘Manike Mage Hithe’ चं आता गुजराती वर्जन आउट

दर आठवड्याला तब्बल १५० गरजू कुटुंब बँकेला भेट देतात आणि आतापर्यंत ५६० कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे. एक व्यक्ती एका भेटीत १० कपडे खरेदी करू शकतो. कपड्यांची ही बँक दर रविवारी गरजूंसाठी खुली असते आणि सर्व वयोगटांसाठी कपडे उपलब्ध होतात. या उपक्रमात शक्य तितक्या सर्वांना मदत करण्याचं आवाहन तरूणांकडून करण्यात येतंय. यासाठी 96119 77074 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.