वाघ, सिंह, बिबट्या हे जंगलाचे राजे आहेत. त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही. या प्राण्यांना सर्वात धोकादायक शिकारी देखील म्हटलं जातं. जर त्याने एखाद्याची शिकार करण्याचा निर्णय घेतला तर तो क्वचितच मागे हटतो. त्याचे पंजे इतके मजबूत असतात की ते सर्वात मोठी शिकारही सहज पकडू शकतात. आता विचार करा हाच सिंह जर मानवी वस्तीत शिरला तर..अशीच घटना सध्या समोर आली आहे. तमिळनाडूमध्ये एका महिलेच्या घरी चक्क सिंह शिरला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिबट्याची गणना धोकादायक आणि निर्दयी शिकारी प्राण्यांमध्येही केली जाते. याला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा प्राणी एका झटक्यात आपल्या शिकारीवर तुटून पडतो. दिसायला सिंह आणि वाघापेक्षा तो खूपच लहान असला तरी तो अतिशय चपळ आणि दुष्ट भक्षक आहे. शिवाय त्याची शरीररचना अशी असते की तो उंचच उंच अशा झाडांवर सुद्धा सहजरित्या चढू शकतो.
बिबट्यानं महिलेसह अग्निशमन दलाच्या जवानांना केलं जखमी
बिबट्या एका घरात घुसताना व्हिडिओत दिसतं. तामिळनाडूतील नीलगिरी येथील ब्रुकलँड परिसरातील एका घरात बिबट्या शिरला. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान बिबट्या ज्या घरात शिरला त्या घरात एक महिलाही होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या महिलेला वाचवलं असून त्यामध्ये तेही जखमी झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! फटाक्यांसोबत मस्ती, कुणाच्या लुंगीत तर कुणाच्या अंगावर टाकले फटाके; दिवाळीतले VIDEO व्हायरल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @ANIया पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.