ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं तिच्याशिवाय करमत नाही म्हणून एका तरुणाने चक्क होणाऱ्या बायकोला पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी हा तरुण किती उत्सुक होता याचा अंदाज तुम्ही लावू शकता. सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. अनेक लोकं आपली लग्न या हंगामामध्ये उरकून घेत आहेत. पण काही लग्न योग्य मुहूर्त न मिळाल्यामुळे पुढं ढकलावी लागत आहेत.

मात्र, लग्नाचा मुहुर्त लांबचा धरल्यामुळे एका तरुणाने असं काही केलं आहे. जे ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. या पठ्ठ्याने ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं होतं तिच्यापासून लांब राहणं अशक्य होत असल्यामुळे त्याने त्या मुलीलाच पळवून नेलं आहे. पण लग्न ठरलेली मुलगी अचानक गायब झाल्यामुळे मुलीच्या घरात एकच गोंधळ सुरु झाला होता.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल

हेही वाचा- ‘श्री हर्षद मेहता प्रसन्न!’ पाहा शेअर मार्केट प्रेमीची ही भन्नाट लग्नपत्रिका, देवांच्या जागी ‘बिग बुल’ची नावं

मात्र, घरच्या लोकांना जेव्हा त्यांची मुलगी होणाऱ्या नवऱ्यासोबतच पळून गेली असल्याचं समजलं, त्यावेळी त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण तोपर्यंत पोलिसांकडे मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंद झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दरियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. अकबरपूरमधील बोलबम साहनी या तरुणाचे राम रुद्रपूर गावातील संध्या नावाच्या मुलीशी लग्न ठरलं होतं. या दोघांचा साखरपुडाही झाला होता.

मोबाईलमुळे वाढली ओढ –

मात्र, लग्नाची तारीख जवळचा योग्य मुहूर्त नसल्याने पुढील वर्षातील धरली. पण नवरदेवासा काही आपल्या होणाऱ्या बायकोशिवाय करमत नव्हतं. शिवाय सर्वांच्या साक्षीने दोघांचे लग्न ठरल्यामुळे संध्या आणि बोलबम हे दोघं कोणालाही न घाबरता रोज मोबाईल फोनवर तासंतास गप्पा मारत बसायचे. रोजच्या बोलण्यामुळे दोघांमधील जवळीक एवढी वाढली की, बोलबमला संध्याशिवाय राहणं अशक्य वाटू लागलं. त्यामुळे त्याने संध्याच्या संमतीने कोणालाही न सांगता घरातून पळून जाण्याचं ठरवलं आणि ठरवल्याप्रमाणे ते दोघे पळून गेले.

हेही वाचा- ऐकावं ते नवलचं! १ कोटीचं पॅकेज तरिही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार

दरम्यान, या प्रकरणी पनापूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तपास सुरू करून मुलीला ताब्यात घेतलं. दोघांनीही पोलिसांना खरी परिस्थिती सांगितली आणि एकमेकांशिवाय आता दोघांनाही राहणं अशक्य असल्याचं त्यांनी पोलिसांना पटवून दिलं. त्यामुळे पोलिसांनी ही त्यांच्या प्रेमाला सहमती दर्शवली आणि दोघांच्या कुटुंबीयाच्या सहमतीने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि अखेर पोलिसांच्या उपस्थितीत ठाकूरबारी मंदिरात या दोघांचे लग्न लावून देण्यात आलं. पण लग्न ठरलेलं असतानाही हे दोघं पळून का गेले हा मात्र परिसरातील लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

Story img Loader