काही दिवसांपुर्वी रिक्षावर बाग तयार केल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. दिल्लीमधल्या या रिक्षाचालकाने तेथील उष्णतेवर पर्याय म्हणून ही भन्नाट शक्कल लढवली होती. या नैसर्गिक थंडावा देणाऱ्या रिक्षानंतर आता प्रवाशांना मोफत चॉकलेट, बिस्कीट देणाऱ्या रिक्षाचा फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये प्रवाशांसाठी काही खायच्या वस्तु आणि त्यासह इमर्जन्सीसाठी प्रथमउपचारामधील वस्तु असे सामान ठेवलेले दिसत आहे.

व्हायरल होणारा हा फोटो उत्तम कश्यप या ट्विटर युजरने शेअर केला आहे. बंगळूरमधील हा फोटो शेअर करत त्यांनी या अनोख्या रिक्षाची माहिती दिली. या रिक्षामध्ये प्रवाश्यांसाठी चॉकलेट, बिस्कीट असे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. तसेच कोणाला काही दुखापत झाली तर त्यासाठी प्रथमउपचाराचे सामान देखील इथे ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. या रिक्षाचालकाचे नाव राजेश असून, त्यांच्यासाठी ग्राहक सर्वात जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी उत्तम यांना सांगितल्याचे कॅप्शनमध्ये लिहले आहे. पाहा व्हायरल होणारा हा फोटो.

व्हायरल फोटो :

रिक्षाचालकाची ग्राहकांप्रतीच्या सेवाभावनेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Story img Loader