सध्याच्या जमान्यात अनेक लोकं गाणी ऐकण्यासाठी इयरबडचा वापर करतात. अनेकवेळा आपण गाडी चालवताना किंवा हातामध्ये काही काम असेल आणि मोबाईल हातात धरणं शक्य नसेल, अशा वेळी हे वायरलेस डिव्‍हाइस (इयरबड) आपल्या कामाला येते. मात्र, हा इयरबडचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे धोकेही आहेत.

कारण, एखाद्या व्यक्तीने इयरबड वापरताना थोडासा निष्काळजीपणा केला तर ते किती घातक ठरु शकतं, याचं उत्तम उदाहरण आता समोर आलं आहे. कारण एका व्यक्तीच्या कानात तब्बल पाच वर्षांपासून इयरबड अडकल्याची धक्कायाक घटना उघडकीस आली आहे. कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे. शिवाय ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे त्याला देखील स्वत:चा रिपोर्ट पाहून धक्का बसला आहे.

ubt defeat candidate shankarrao gadakh
सहा जणांच्या माघारीनंतर मतदान यंत्र पडताळणीच्या रिंगणात उरले एकमेव पराभूत शंकरराव गडाख
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Fifty eight people died in horrific accident at Kanhan railway crossing near Nagpur 20 years ago
२० वर्षांपूर्वीच्या भीषण रेल्वे अपघाताचे स्मरण, काय घडले होते?
Sound beauty is preparing ears to hear sounds of body
ध्वनिसौंदर्य: नादयोग
Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
Bill Gates and Melinda French Gates
Bill Gates: २७ वर्षाचा संसार नंतर काडीमोड; अब्जाधीश बिल गेटस् यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत नेमकी काय?
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट

आणखी वाचा- अती घाई संकटात नेई! औषध म्हणून महिलेने गिळले अ‍ॅपलचे एअरपॉड; एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले चकीत

रॉयल नेव्हीमध्ये काम करणाऱ्या इंग्लंडमधील विलिस ली नावाचा व्यक्ती पाच वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विमानातून निगाला होता. त्यावेळी विमान उड्डाण करतानाचा आवाज टाळण्यासाठी त्याने कानात इयरबड लावले. पण तो ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर तो कानात लावलेले इयरबड काढायला विसरला आणि हळूहळू ते इयरबड त्याच्या कानात खोलवर शिरले.

नेमकं प्रकरण काय आहे-

शिवाय हे इयरबड आकारने लहान असल्यामुळे त्यावेळी त्याला लगेच काही त्रास जाणवला नाही. पण कालांतराने विलिसला कानाद्वारे ऐकण्यात अडचण येऊ लागली. सुरुवातीला त्याला वाटलं की, एविएशन इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष काम केल्यामुळे आपल्याला नीट ऐकू येत नसेल. म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

शिवाय तरुणात खेळताना देखील विलिसच्या कानाला दुखापत झाली होती. त्यामुळे देखील आपल्याला ऐकण्यात अडचण येत असेल त्याला वाटलं. मात्र, जसजसा त्याच्या कानांचा त्रास वाढत गेला, त्यावेळी मात्र त्याने एक एन्डोस्कोप किट विकत घेतलं आणि स्वत:च घरामध्ये कान चेक केला त्यावेळी त्याला कानात काहीतरी पांढरी वस्तू अडकल्याचं समजलं.

आणखी वाचा- २१ तोफांची सलामी! बँकेतील पैसे डिपॉजिट स्लिपवर लिहिलेला मजकूर पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

कानात काही अडकल्याचं समजताच तो लगेच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी उपचार करुन त्याच्या कानातील ते इयरबड बाहेर काढल्यावर मात्र, विलिसला मोठा धक्का बसला. शिवाय आणखी एक धक्कादाय बाब उघडकीस आली ती म्हणजे हे इयरबड त्याच्या कानात तब्बल पाच वर्षांपासून अडकून पडले होते. दरम्यान, हे इयरबड काढल्यावर त्याला नीट ऐकायला येऊ लागलं आहे. पण इयरबड वापरतानाची आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर किती महागात पडू शकतं याचं उदाहरण समोर आलं आहे.

Story img Loader