चार वर्षाच्या मुलीने तब्बल ६१ चुंबकाचे मणी गिळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीला मागील महिन्यापासून पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता. पोटात दुखण्याचा त्रास जास्त जाणवू लागल्यामुळे मुलीचे पालक तिला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली, तपासणीनंतरही मुलीच्या पोटात दुखण्याचे कारण स्पष्ट न झाल्याने तिच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला. मात्र, मुलीचा एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टरांसह पालकही चक्रावून गेले. कारण या मुलीच्या पोटात तब्बल ६१ चुंबकाचे मणी आढळून आले. याबाबत एका इंग्रजी वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सावधान! सोशल मीडियाद्वारे ओळख नंतर भावनिक ब्लॅकमेलिंग, एकाच आरोपीकडून १५५ महिलांची फसवणूक

ही घटना चीनमधील असून झेजियांग प्रांतातील हांगझोऊ येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यानंतर मुलीच्या पोटात चुंबकाचे मणी असल्याचं उघडकीस आलं. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, या मुलीच्या पोटातील चुंबकाच्या मण्यांची संख्या आणि आकारामुळे ते मणी काढण्यासाठी ३ तासांचं ऑपरेशन करावं लागल्याची माहिती द चिल्ड्रन्स हॉस्पिटल, झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनम येथील डॉक्टरांनी दिली.

मुलीने हे लहान चुंबकाचे मणी टप्प्याटप्प्याने गिळल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल. हे मणी तिच्या आतड्यांसंबंधी मार्गाच्या वेगवेगळ्या भागात गेले आणि ती एकमेकांकडे आकर्षित झाल्यामुळे ते चिकटले त्यामुळे काही ठिकाणी छिद्र पडायला लागली होती, असंही डॉक्टरांनी सांगितलं. या चिमुरडीच्या आतड्यामध्ये १४ छिद्रे सापडली, ती प्रत्येक छिद्रांना एक एक करून व्यवस्थित जोडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हेही पाहा- लेक वणव्यामध्ये गारव्यासारखी! आईला होणारा उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी चिमुरडीची धडपड; डोळ्यात पाणी आणणारा Video Viral

मुलीची प्रकृती सध्या सुधारत आहे, मात्र हे चुंबकाचे बीड्स तिच्या आतड्या जवळच्या भागाला चिकटल्यामुळे भविष्यात धोका उत्पन्न होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, हे लहान चुंबकाचे मणी दुकानांमध्ये किंवा ऑनलाईनदेखील सहज खरेदी केले जाऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांनी ती गिळल्याची अनेक प्रकरणं समोर येतात, यामुळे मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. शिवाय मागील वर्षी हॉस्पिटलमध्ये या प्रकारची जवळपास ८७ प्रकरण आढळून आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral news four year old girl in china undergoes surgery after swallowing 61 magnetic beads jap
Show comments