जयपूरमधील एका पती-पत्नीच्या वादाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय ते जेवढे धक्कादायक तेवढेच गमतीशीर आहे. जयपूर येथील न्यायालयाने एका व्यक्तीला त्याच्या पत्नीला पोटगी म्हणून ५५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. तो आदेश या व्यक्तीने पाळलादेखील पण त्याने चक्क ५५ हजार रुपयांचे नाणी ७ पोत्यांमध्ये भरुन न्यायालयात आणली होती, जे पाहून न्यायाधिशांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील व्यक्तीचा त्याच्या पत्नीशी खूप दिवसांपासून वाद सुरू होता, हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या पत्नीला पोटगी म्हणून काही रक्कम द्यावी असा आदेश कोर्टाने दिला. मात्र या व्यक्तीने त्याच्या पत्नीला काहीच रक्कम दिली नसल्याची माहिती पत्नीने न्यायालयात दिली. यानंतर न्यायालयाने पतीविरुद्ध वॉरंट जारी केलं आणि आरोपी पती दशरथ याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

To support hunger strike Dhangar community member climbed mobile tower
बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Submitted fake document in high court to get illegal benefit of 20 crores
२० कोटींचा बेकायदा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्र सादर, चौघांविरोधात गुन्हा दाखल
High Court refuses to hear PIL seeking ban on use of DJ laser lights in Eid e Milad processions Mumbai news
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावरील बंदीची मागणी; जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Pune Police, Kalyani nagar accident, Juvenile Justice Board, Vishal Agarwal, prosecution, accident car, passport, court hearing, charge sheet, bail, judicial custody
कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी
mother in law and son convicted for setting ablaze daughter in law
शिक्षा स्थगितीस न्यायालयाचा नकार; नववधूची हुंड्यासाठी हत्या; पतीसासूच्या जन्मठेपेच्या शिक्षेची केवळ नऊच वर्षे पूर्ण
Demand for money pune, Hadapsar police,
पुणे : जोगवा मागणाऱ्या एकाकडे हप्त्याची मागणी, हडपसर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा- तब्बल २ वर्ष पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन् जेव्हा ५८ लाखांचं बिल आलं तेव्हा चक्क…

या सर्व घटनेनंतर घाबरलेल्या दशरथने त्याच्या पत्नीला पोटगीचे रक्कम पत्नीला देण्याचं ठरवलं. यासाठी तो न्यायालयात ५५ हजार रुपये घेऊन आला. पण यावेळी त्याने ही सर्व रक्कम चक्क नाण्यांमध्ये आणली होती. शिवाय ही नाणी त्याने सात पोत्यांमध्ये भरून आणली होती. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याची पत्नीदेखील चांगलीच भडकली. तिने न्यायालयात सांगितलं, “मला त्रास देण्याच्या उद्देशाने पतीने हे पैसे नाण्यांच्या स्वरुपात आणले आहेत.” तर यावेळी पतीच्या वकिलाने युक्तिवाद केला, तो म्हणाला, “हे भारताचे चलन आहे, त्यामुळे तुम्ही स्वीकारले पाहिजे.”

हेही पाहा- खाटेवर चढून चक्क घोड्यासारखा भन्नाट डान्स करतोय उंट, व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

तर ७ पोत्यांमधील नाणी पाहून न्यायालयाने ही रक्कम मोजण्यासाठी १० दिवस लागतील असे सांगितले. शिवाय प्रत्येकी एक हजार रुपयांच्या पिशव्या बनवून सर्व नाणी मोजून घेण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले. नाण्यांच्या योग्य मोजणीसाठी २६ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, पतीने न्यायलयात आणलेल्या या नाण्यांची चर्चा मात्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, “एखादा अतिशय हुशार वकील असावा ज्याने नवऱ्याला हा सल्ला दिला” दुसर्‍या यूजरने लिहिले, ” नवऱ्याने अप्रतिम बदला घेतला आहे.”