समाजात दोन प्रकारचे लोक पाहायला मिळतात, एक जे मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात, तर दुसरी विनाकारण या प्राण्यांना त्रास देतात. यातील दुसऱ्या प्रकारामधील लोकांनी देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्या प्राण्यांवर अत्याचार केल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. सध्या अशाच एका माथेफिरुने पाळीव कुत्र्यावर एअर गनने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एका हिंदी वृत्त वाहिनीने माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका व्यक्तीने एअर गनने पाळीव कुत्र्यावर गोळीबार केला. गोळीबारात कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निडी टेल फाऊंडेशन आणि पीपल फॉर अॅनिमल्सने अन्नपूर्णा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अन्नपूर्णा परिसरात राहणाऱ्या वंदना सोनी यांनी तक्रार दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही पाहा- ड्रायव्हरने भरधाव ट्रकच्या खालून आरपार नेली कार, खतरनाक स्टंटचा Video पाहून चक्रावून जाल

नेमकं काय घडलं ?

वंदना सोनी यांच्या शेजारी राहणाऱ्या मोहित नावाच्या व्यक्तीने ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या पाळीव कुत्र्यावर एअर गनने तीन वेळा गोळीबार केला. वंदना यांनी त्यांच्या कुत्र्याला नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला पाठवलं होतं, याचवेळी मोहितने एअर गनमधून कुत्र्यावर गोळीबार केला. कुत्रा जखमी झाल्यामुळे त्याच्या अंगातून रक्त येऊ लागले आणि तो मोठ्याने भुंकू लागला. आपल्या कुत्र्याचा आवाज ऐकून वंदना या धावत घराबाहेर आल्या आणि त्यांनी जखमी कुत्र्याला तातडीने रुग्णालयात नेले.

हेही पाहा- ‘पतली कमरिया मोरी’ गाण्याची महिला शिक्षिकेला पडली भुरळ, विद्यार्थ्यांसमोर केलेला भन्नाट डान्स होतोय Viral

या धक्कादायक घटनेनंतर कुत्र्याची मालकीण वंदना, निडी टेल फाउंडेशनचे कार्तिक तन्वर आणि पीपल फॉर अॅनिमल्स, इंदूर युनिटचे प्रियांशू जैन यांनी अन्नपूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, “आरोपी मोहित सिंग विरोधात प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.” या घटनेचा अनेक प्राणी प्रेमींनी तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याती मागणी केली आहे.

Story img Loader