तेलंगणामधील एक माणूस गुहेत अडकल्याची घटना गेले काही दिवस चर्चेत होती. या माणसाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
गुहेत अडकलेल्या या व्यक्तीचे नाव राजू असून, फोन गुहेत पडल्याने तो शोधण्यासाठी ते गुहेत गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुहेत गेल्यानंतर दोन मोठ्या दगडांच्या मध्ये ते अडकले. १३ डिसेंबर रोजी ही घटना घडली, पण दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबरला तेथील रहिवाश्यांसह, पोलिसांना याबाबत समजले.
आणखी वाचा: Viral: हर्ष गोएंकांनी सांताक्लॉजकडे मागितले गिफ्ट; म्हणाले ‘यावर्षी…’
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ डिसेंबरला दुपारी २ ला ही घटना घडली, पण याची माहिती त्यांना १४ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता मिळाली. त्यांनंतर जेसीबीच्या मदतीने तेथील दगड तोडून, त्यांना बाहेर काढण्यात यश मिळाले. यानंतर त्यांना दवाखान्यात पाठवण्यात आले.