तुम्हाला अचानक धनलाभ झाला तर? तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. लगेच या पैशांचे काय काय करता येईल याची यादी तयार करायला सुरू कराल. नातेवाईक, मित्रमंडळी यांमध्ये हा धनलाभ चर्चेचा विषय ठरतो. असाच एक धनलाभ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या बँकेत पगाराबरोबर चक्क १० कोटी रुपये मिळाले आहेत. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील आमिर गोपांग या पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या पगाराबरोबर बँक अकाउंटमध्ये १० कोटी रुपये जमा झाल्याचा बँकेतून फोन आला. हे पैसे अज्ञात व्यक्तीकडुन पाठवण्यात आल्याचे आमिर गोपांग यांनी सांगितले. ही रक्कम ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
आणखी वाचा : वयाच्या ३५ व्या वर्षी जेव्हा त्याला पहिल्यांदा ऐकायला येऊ लागले…; Viral Video पाहून नेटकरी झाले भावूक
आमिर गोपांग पाकिस्तानमधील कराची येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बँकेकडुन आमिर गोपांग यांना त्यांच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झाल्याचे कळवण्यात आले. पण त्यावर काहीही करण्याअगोदरच बँकेकडुन खाते फ्रोज आणि एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले. हे पैसे कोणी पाठवले याचा तपास सुरू आहे.