विमानप्रवास हा प्रवास करण्यासाठीचा अतिशय वेगवान मार्ग आहे. यामुळे अवघ्या काही तासांमध्ये आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचू शकतो. त्यामुळेच आता अनेकजण विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. यामुळे वेळेची बचत तर होतेच, पण त्याचबरोबर सोयीस्कर प्रवासही करता येतो. मात्र, कधीकधी लहानशी चूक अपघाताचे मोठे कारण बानू शकते. यामुळेच विमान प्रवासादरम्यान वैमानिक त्यांचे काम अत्यंत सावधगिरीने पार पाडतात.

पण हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानात वैमानिकांनी आपापसातच भांडण सुरू केले तर? अशीच एक घटना फ्रान्समध्ये घडली आहे. एअर फ्रान्सचे दोन पायलट फ्लाइट दरम्यान एकमेकांशी भांडू लागले. हे प्रकरण इतके वाढले की दोन वैमानिकांमध्ये सुरू असलेले भांडण थांबवण्यासाठी फ्लाइट अटेंडंटला यावे लागले.

मैत्रिणीसोबत कारमध्ये सापडलेल्या भाजपा नेत्याला बायकोने रस्त्यावरच चप्पलने झोडपलं; Video होतोय व्हायरल

ला ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, एअर फ्रान्सचे विमान जिनिव्हाहून पॅरिसला जात होते. विमानाने निर्धारित उंचीवर पोहोचताच, ब्रीफकेस एकमेकांच्या सामानाच्या वर ठेवण्यावरून दोन वैमानिकांमध्ये वाद झाला. एका पायलटने दुसर्‍याची आज्ञा पाळण्यास नकार दिल्याने परिस्थिती आणखी बिघडली आणि शाब्दिक युद्धाचे रुपांतर हाणामारीत झाले. एका पायलटने दुसऱ्याला कानाखाली मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांची कॉलर पकडून कॉकपिटच्या आत मारामारी सुरू केली. दोघांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ झाल्याचा आवाज इतका मोठा होता की फ्लाइट अटेंडंटसह प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

प्रकरण चिघळत असल्याचे पाहून विमानात उपस्थित असलेल्या केबिन क्रू मेंबर्सनी हस्तक्षेप केला. सुदैवाने कॉकपिटला आतून बंद नसल्याने फ्लाइट अटेंडंटनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि हाणामारी करणाऱ्या वैमानिकांना एकमेकांपासून दूर केले. तथापि, विमान उड्डाण करण्यासाठी दोन्ही वैमानिकांची गरज असल्याने उर्वरित प्रवास पूर्ण करण्यासाठी दोघांनाहीएकमेकांजवळ बसने भाग होते. दरम्यान, या दोन वैमानिकांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊ नये म्हणून त्यांच्या मागे एक धष्टपुष्ट केबिन क्रू मेंबर बसला होता. त्यानंतर विमान आपल्या गंतव्य पॅरिस विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

Viral Video : गर्दीच्या रस्त्यामधून वाट काढण्यासाठी पट्ठ्याने लढवली गजब शक्कल; असा देशी जुगाड तुम्ही कधी पाहिला का?

दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आले

घटनेचे गंभीर स्वरूप पाहता एअर फ्रान्सने स्पष्टीकरण दिले. एअर फ्रान्सच्या प्रवक्त्याने कॉकपिटमधील वैमानिकांमधील भांडणाचे वर्णन “पूर्णपणे अयोग्य वर्तन” असे केले. फ्रान्सच्या नागरी उड्डाण सुरक्षा तपास प्राधिकरणाच्या अहवालानुसार, या वैमानिकांना निलंबित करण्यात आले आहे. एअरलाइनने पुष्टी केली की जूनमध्ये एअरबस A320 फ्लाइट दरम्यान ही घटना घडली. घटनेदरम्यान वैमानिकांचे अनुचित वर्तन वादाचे कारण ठरले होते.

Story img Loader