पोटातला गॅस (पाद) विकून आठवड्याला ३७ लाख रुपये कमावणारी स्टेफनी मॅटिओ आजारी पडली असून तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. स्टेफनीने सांगितले की, “मला वाटले की हृदयविकाराचा झटका आला आहे आणि ही माझी शेवटची वेळ आहे.” तिने कबूल केले की ती पोटातला गॅस विकण्याचे जास्त काम करू लागली आहे. पोटातला गॅस अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी, स्टेफनी दररोज ३ प्रोटीन शेक आणि एक वाटी ब्लॅक बीन सूप घ्यायची. छातीत दुखू लागल्यानंतर आता त्यांनी हा अजब व्यवसाय सोडण्याची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

स्टेफनी मॅटेओ ही एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे आणि तिने ९० डे फियान्समध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टेफनीला छातीत दुखू लागल्यानंतर आणि हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तासह अनेक चाचण्यांनंतर, स्टेफनीला सांगण्यात आले की तिच्या छातीत दुखत आहे त्याचं कारण गॅस तयार करणार्‍या सोयाबीन आणि अंडी आहेत. स्टेफनी त्यांचे सतत सेवन करत होती.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

गॅसमुळे श्वास घेण्यास झाला त्रास

स्टेफनी दर आठवड्याला पोटातला गॅस विकून ३७ लाख रुपये कमवत होती. ती दर आठवड्याला पन्नास बरण्या पोटातला गॅस भरून विकायची. तिच्या एका जारची किंमत १००० डॉलर्सच्या जवळपास होती. सोशल मीडियावर ती तिच्या २ लाख ६० हजार फॉलोअर्सना हा पोटातला गॅस विकायची. स्टेफनीने सांगितले की, आजारपणात तिला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. तिने श्वास घेतला की हृदयाभोवती संवेदना जाणवू लागल्या.

(हे ही वाचा: “गडपती,गजअश्वपती,भूपती…” चिमुरडीच्या शिवगर्जनेचा अंगावर काटा आणणारा Video Viral)

अमेरिकेतील कनेक्टिकट येथे राहणाऱ्या स्टेफनीने तिच्या मैत्रिणींना तिला रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिने त्याच्या विचित्र करिअरबद्दल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सांगितले नाही. डॉक्टरांनी तिला आहार बदलण्यास सांगितले आणि गॅस बंद करण्यासाठी औषध दिले. यामुळे तिचा व्यवसाय डबघाईला आला.

(हे ही वाचा: चालत्या ट्रेनच्या डब्याच्या बाहेर कपलिंगवर बसून दोन व्यक्तीने केला प्रवास; Video Viral)

(हे ही वाचा: Viral News: टीव्ही स्टारने ‘पाद’ विकून एका आठवड्यात कमावले ३८ लाख रुपये; प्रक्रियेबद्दल स्वत: व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं)

स्टेफनीने यापूर्वी खुलासा केला होता की, ‘अनेक वर्षांपासून मला महिला आणि पुरुषांकडून संदेश येत आहेत जे मी परिधान केलेले कपडे, आंघोळीचे पाणी इत्यादी खरेदी करू इच्छितात. मला वाटले की पोटातला गॅस विकणे मजेदार आणि अद्वितीय आहे.’ तिने दावा केला होता की तिला दररोज शेकडो ऑर्डर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral news stephanie matto made rs 37 lakh per week by selling her farts retires from business ttg