Chennai Temple iPhone Case : मंदिरात देवदर्शनाला गेल्यावर प्रत्येकजण आप-आपल्या श्रद्धेनुसार दान करत असतो, दान पेटीत काहीना काही टाकत असतो. काहीजण पैसे टाकतात तर काहीजण सोने-चांदीसुद्धा दान करतात. यानंतर आपण जे देवाला अर्पण केलं ते देवाचं झालं असं म्हणतात. पण विचार करा या दानपेटीत तुमची एखादी मौल्यवान वस्तू चुकून पडली तर… तामिळनाडूमधील एका भाविकासोबत असंच घडलं. त्याचा आयफोन चुकून दानपेटीत पडला आणि तो देवाचा झाला म्हणत मंदिर प्रशासनाने देण्यास नकार दिला.

नेमकं काय घडलं?

Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News In Marathi
Crime News : आतडे फाडले अन् हवेत… आईच्या प्रियकराची भावंडांकडून क्रूर हत्या
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
Shocking video Kadayanallur the Auto Rickshaw Toppled While The Driver Was Trying To Slap A Boy Who Was Riding A Cycle On The Road video goes viral
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?

चेन्नईतील थिरुपुरुरच्या अरुलमिगु कंदस्वामी मंदिरातील ही घटना. विनायगपुरमधील हा भाविक ज्याचं नाव दिनेश आहे. एका भाविकाचा आयफोन चुकून दानपेटीत पडला आणि तो मंदिराची संपत्ती बनला. एक महिन्यापूर्वी तो आपल्या कुटुंबासह मंदिरात गेला होता. देवाची पूजा केल्यानंतर त्याने हुंडी म्हणजे दानपेटीत काही पैसा टाकायला गेला. त्याने सांगितलं जेव्हा तो आपल्या शर्टच्या खिशातील पैसे काढत होता. तेव्हा आयफोन चुकून दानपेटीत पडला. ही हुंडी म्हणजे दक्षिणेकडील मंदिरांमध्ये असणारी दानपेटी बरीच उंचावर असून त्यावर लोखंडी जाळीसुद्धा होती. ज्यामुळं दिनेश यांना त्यातून फोन काढता आला नाही.

‘आता तो देवाचा’

आपला फोन बाहेर काढणं अशक्य असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला पण तिथं त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. जी वस्तू दानपेटीमध्ये टाकली जाते ती देवाचीच होऊन जाते आणि ती परत केली जात नाही. परंपरेनुसार हुंडी दोन महिन्यांतून एकदाच उघडली जाते, असं व्यवस्थापनाकडून त्यांना सांगण्यात आलं. दिनेशने हिंदी आणि धार्मिक संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तेव्हा दानपेटी कधी उघडणार हे सांगितलं. अखेर शुक्रवारी हुंडी उघडण्यात आली. याची माहिती मिळताच दिनेश तिथं पोहोचला. पण मंदिर प्रशासनाने तो आयफोन आता मंदिराची संपत्ती असल्याचं सांगत फोन देण्याऐवजी सिम कार्ड आणि फोनमधील महत्त्वाचा डेटा डाऊनलोड करण्याचा पर्याय दिला.

हेही वाचा >> तुम्हीही कार पार्क करुन बिनधास्त निघून जाता? अवघ्या सेंकदात बंद कारमध्ये कशी करतात चोरी पाहा; मुंबईतला VIDEO पाहून धक्का बसेल

तसेच शेवटी हीच घटना कोणा दुसऱ्यासोबत घडली असती तरीही इथंही तसाच न्याय लागू असता असं स्पष्टीकरण मंदिरातून देण्यात आलं आहे.

l

Story img Loader