तंत्रज्ञानाच्या युगात खरेदी विक्री करण्यासाठी अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत. या माध्यमातून लोकं रोजची देवाणघेवाण करत असतात. यामुळे वेळ आणि योग्य किंमत देऊन वस्तू घेता येते. मात्र या प्लॅटफॉर्म कोण काय विकेल सांगता येत नाही. तुम्ही आतापर्यंत ऑनलाइन जेवण, धान्य, मेडिसिन, कपडे आणि इतर वस्तू मागवल्या असतील. कारण या वस्तूंचा दैनंदिन जीवनात वापर होतो. मात्र दुर्गंधीयुक्त पाद विकल्याचं कधी ऐकलं आहे का? तुम्हाला वाचल्यानंतर कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. पादणं काही समाजात चांगलं समजलं जात नाही. पण पाद थांबवता येत नाही. कधीतरी चित्रविचित्र आवाज करत वायू त्याला जागा मिळेल तिथून बाहेर पडतोच. आजूबाजूचे नाकाला हात लावतात आणि पादणार्‍याचं हसं होतं. तुम्ही निंदा किंवा वंदा, पण आता पादण्याचा धंदा झाला आहे. अमेरिकेची टीव्ही स्टार स्टेफनी मॅटोने असाच धंदा करते. आपला पाद ऑनलाइन विकून लाखोंची कमाई करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून स्टेफनीने याबाबतची माहिती स्वत: दिली आहे. यामध्ये तिने ती पाद कशी विकते हे सविस्तर सांगितले आहे. ती या व्हिडिओमध्ये सांगते की, तिने प्रथम पाद एका बरणीत बंद करते. त्यात काही गुलाबाच्या पाकळ्या आधीच ठेवलेल्या असतात. यानंतर एका खासगी चिठ्ठीसह विकते. यासाठी ती तिच्या खाण्यापिण्यावर अधिक लक्ष देते, जेणेकरून गॅस चांगला होऊ शकेल. तिच्या जेवणात बीन्स, प्रोटीन, अंडी आणि दही यांचा समावेश करते. पाद आल्यावर ती एका बरणीत बंद करते. या बरणीत फुलांच्या पाकळ्या असतात. त्‍यामुळे त्‍याच्‍या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधात होते. त्यानंतर ती त्याचा दर ठरवून विकते.

एका आठवड्यात पाद बरण्या विकून तिने ३८ लाख रुपयांची कमाई केली आहे. पाद बरणीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर लोकं खरेदीसाठी संपर्क साधतात. आतापर्यंत ९७ पाद बरण्यांच्या ऑर्डर मिळाल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा तिचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral news tv star earn rs 38 lakh in week by selling fart rmt