घरची साफसफाई करताना एका महिलेचं आयुष्य एका गोष्टीमुळे बदललं. कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे ही महिला रातोरात कोट्यवधी झाली. या महिलेला घरात सापसफाई करताना कचऱ्यात चक्क ३४ कॅरेटचा हिरा सापडला. जो हिरा या महिलेला सापडला त्याची किंमत ऐकून हैराण व्हाल. या हिऱ्याची किंमत तब्बल २० कोटी इतकी आहे.
युनायटेड किंगडममध्ये, एका वृद्ध महिलेला तिच्या संग्रहातून 34 कॅरेटचा हिरा सापडला, ज्याची किंमत £2 दशलक्ष किंवा सुमारे 20 कोटी रुपये होती. या 70 वर्षीय महिलेने वर्षांपूर्वी कार बूट विक्रीतून एक दगड खरेदी केला होता. मात्र, त्याच्या किंमतीची त्याला कल्पना नव्हती. महिलेला इतर दागिन्यांमध्ये हिरा सापडला होता आणि ती ती डस्टबिनमध्ये टाकणार होती. तथापि, शेजाऱ्याच्या सूचनेनंतर त्याने त्याचे मूल्य जाणून घेण्याचे ठरवले.
खूप वर्षापूर्वी नाण्याच्या आकारासारखा दिसणारा हिरा खरेदी केला होता. ही महिला यूकेमध्ये राहणारी आहे. पण हा हिरा नेमका कुठून आणला हे मात्र तिला आठवत नाही. घरात साफसफाई करताना एका कपाटाच्या कोपऱ्यात हा हिरा सापडला. कोणत्या तरी ड्रेसमधला हिरा पडला असेल, असं या महिलेला वाटलं आणि तो खडा समजून हा हिरा कचऱ्यात फेकण्यासाठी निघाली. या खड्यावर जेव्हा प्रकाश पडला तेव्हा हा खडा चमकू लागला. त्यानंतर तिच्या शेजारणीला तो खडा नसून हिरा असल्याचा संशय आल्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी सांगितलं. हे ऐकून या महिलेने कचऱ्यात फेकलेला चमकणारा खडा उचलून स्वच्छ केला आणि तपासणीसाठी घेऊन गेली. त्यानंतर या महिलेचं आयुष्यचं बदलून गेलं. एका रात्रीत ही महिला कोट्यावधी बनली.
आणखी वाचा : अबब! केवळ एक रूपयाला मिळतात इथे कपडे…कुठे आणि काय आहे कारण पाहा!
हा चमकणारा खडा नव्हे तर हिरा असल्याचं जेव्हा या महिलेला कळलं त्यानंतर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. एव्हढंच नव्हे तर हा दुर्मिळ हिरा असून सुरूवातीला याची किंमत सुद्धा ठरवणं अवघड झालं होतं. एचआरडी डायमंड ग्रेडिंग लॅबमध्ये जेव्हा हा हिरा पाठवण्यात आला त्यानंतर याची किंमत जी सांगितली, ती ऐकून ही महिला हैराण झाली. हा एच व्ही एस १ हिरा असून तो ३४.१९ कॅरेटचा असल्याचं कळलं. या हिऱ्याला द सीक्रेट स्टोन असं देखील म्हणतात. हा दुर्मिळ हिरा विकण्याचा निर्णय आता या महिलेने घेतलाय. हिरा लिलावात जवळपास २२ ते २७ लाख डॉलर या किंमतीत विकला जाईल असा अंदाज लावला जातोय.