अनेक लोकांना आपली कामं गडबडीत करण्याची सवय असते. पण ‘अती घाई संकटात नेई’ असं म्हणतात त्यानुसार गडबडीत कामं करण्याची सवय आपणाला एखाद्या दिवशी अडचणीत आणण्याची शक्यता असते. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ती वाचून तुम्हाला धक्का बसेल, कारण एका महिलेने गडबडीत औषधाच्या ऐवजी अ‍ॅपल एअरपॉडचा एक भाग गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा एअरपॉड त्या महिलेच्या पोटात गेला तरी सुरुच होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- २१ तोफांची सलामी! बँकेतील पैसे डिपॉजिट स्लिपवर लिहिलेला मजकूर पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोस्टने येथील असून ती एक वर्षापुर्वी घडली आहे. या घटनेतील महिलेने सांगितलं की, तिला डोकेदु:खीचा त्रास असल्यामुळे ते इब्रुप्रोफेन हे औषध घेत होती. एक दिवस ती कामाच्या गडबडीत असताना तिचे डोके अचानक दुखायला लागले म्हणून ती औषध खाण्यासाठी आली. मात्र, त्या औषधाच्या जवळच तिने तिचे अ‍ॅपलचे एअरपॉड ठेवले होते. ती आधीच घाईत होती आणि अशातच डोकं दुखत असल्यामुळे तीने सवयीप्रमाणे गडबडीत औषध घेतलं. पण काही वेळाने आपण औषध नव्हे तर अ‍ॅपलचे एअरपॉड गिळाले असल्याचं समजलं.

आणखी वाचा- Viral Video: सरावादरम्यान घडला अनर्थ! उडत्या विमानातून जवान कोसळला थेट जमिनीवर; पाहा घटनेचा थरार

घटनेतील महिलेला तिच्यासोबत झालेला प्रकार समजताच तिने ते एअरपॉड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते बाहेर काढता आले नाहीत. दरम्यान, या महिलेने लगेच रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी महिलेचा एक्स-रे काढला तर एअरपॉड तिच्या पोटातच असल्याचं निष्पण झालं. महत्वाचं म्हणजे हा एअरपॉड तिच्या पोटात गेले तरी देखील सुरुच होते.

शिवाय या महिलेच्या पोटातील आवाज देखील रेकॉर्ड करु शकत होता. हा सर्व प्रकार पाहून डॉक्टर देखील चकीत झाले होते. याबाबत सर्व घटनेबाबत घटनेतील महिलेने स्वतः माहिती देत तिच्याकडून घडलेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, या घटनेपासून इतरांनी धडा घ्यावा आणि गडबडीत कामं करत असताना आपली काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral news woman swallows apple airpods as medicine jap
Show comments