म्हातारपण हे अनेक आजरांना निमंत्रण देणार असतं. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर म्हातारपणी शरीर थकणे स्वाभाविक आहे. या वयात शरीरातील शक्ती कमी झाल्यामुळे अनेकांना इतरांवर अवलंबुन राहावे लागते. पण काहीजण उतार वयातही इतके फिट असतात, की त्यांचा फिटनेस तरुणांनाही लाजवेल असा असतो. अशाच एका फिटनेसमुळे चर्चेत असणाऱ्या महिलेबद्दल जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्नेस्ट शेफर्ड या ८६ वर्षाच्या महिलेच्या फिटनेसची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या महिलेला २०१० साली ‘जगातील सर्वात वयस्कर बॉडी बिल्डर’चा किताब मिळाला होता. डेली स्टार वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अर्नेस्ट शेफर्ड या अमेरिकेतील बाल्टीमार येथे राहतात.

आणखी वाचा: नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं

अर्नेस्ट शेफर्ड दर आठवड्याला १२८ किलोमीटर जॉगिंग करतात. अक्रोड, चिकन, पालेभाज्या असे पदार्थ त्या भरपूर प्रमाणात खातात. इतकेच नाही तर दरदिवशी त्या ५२ किलोचे बेंचमार्क व्यायाम करतात. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षापासून स्वतःला व्यायाम करण्याची सवय लावली आणि तेव्हापासून त्यांचे जीवनच बदलून गेले, आता त्या तरुणपणात पेक्षा जास्त ऊर्जा असल्याचा अनुभव घेत असल्याचे त्यांनी सांगितले.