सोशल मीडियावर सध्या छोट्या कारची जोरदार चर्चा आहे. एवढंच नाही तर अ‍ॅलेक्स ऑर्चिन नावाच्या व्यक्तीने या गाडीने ८७० किमी अंतर कापत ब्रिटन भ्रमंती केली आहे. त्यामुळे या गाडीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय अ‍ॅलेक्स यांनी सोपा वाटणारा प्रवास रोमांचक केला. युकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी जगातील सर्वात लहान कारचा वापर केला. या संपूर्ण प्रवासात अ‍ॅलेक्सच्या कारचा वेग २३ किमी होता होता. गुगल मॅप्सवर आधारे पाहिलं तर जॉन ओ’ग्रोट्स ते लँड्स एंडपर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त १४ तास लागतात. पण हा प्रवास अ‍ॅलेक्सने तीन आठवड्यात पूर्ण केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅलेक्स यांनी १३ नोव्हेंबरला प्रवास सुरू केला होता. तीन आठवड्यांनंतर त्याचा प्रवास संपला. गाडी इतकी छोटी आणि वरून वेग कमी असल्याने रस्त्यात प्रत्येक जण अ‍ॅलेक्सकडे कुतुहूलाने बघत होता. ज्या कारमध्ये अ‍ॅलेक्सने प्रवास पूर्ण केला त्या गाडीचं नाव पील P50 आहे. या गाडीची निर्मिती १९६२ मध्ये करण्यात आली आहे. १९६२ ते १९६५ या कालावधीत गाडीचं उत्पादन केलं गेलं. त्यानंतर कारचे उत्पादन बंद करण्यात आले. या गाडीला एकच दरवाजा आहे.

तीन आठवडे छोट्या कारमध्ये बसणं एक आव्हान होते. अ‍ॅलेक्सची उंची ५ फूट ११ इंच आहे. अशा स्थितीत कारमध्ये बसणं आव्हान होते. कार फक्त १३७ सेमी लांब आणि ९९ सेमी रुंद आहे. त्याचबरोबर गाडीचे वजन खूपच कमी असल्याने अडचणी होत्या. त्यात यूकेमध्ये नुकत्याच झालेल्या वादळात गाडी चालवणे खूप कठीण होते. मात्र अ‍ॅलेक्स यांनी सर्व अडचणीवर मात करत यश मिळवले.

अ‍ॅलेक्स यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. अ‍ॅलेक्स यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे आभार मानले आहेत. लोकांनी केलेले ट्वीट रिट्वीट करत शुभेच्छांचा स्वीकार केला आहे.