सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक हरीण लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.
फोटोतील डोंगराचा रंग आणि हरिणाचा रंग जवळ जवळ सेमच असल्यामुळे फोटोमध्ये पटकन हरीण शोधण कठीण होत आहे. यासाठी तुमची तीक्ष्ण नजर कामी येईल. बघा प्रयत्न करून तुम्हाला हरीण सापडतंय का?
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का? )
एवढा वेळ शोधूनही हरीण सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला या कोड्याचं उत्तर देतो. नक्की हरीण कुठे लपलेले आहे हे शोधायला मदत करतो. फोटोच्या डाव्याबाजूला खाली झूम केलं की तुम्हाला हे हरीण दिसेल.
(हे ही वाचा: …अन् बुट काढून सलमान खानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं अभिवादन; महाराष्ट्रभरात Video चर्चेत)
‘इथे’ आहे हरीण
(हे ही वाचा: पानिपतमध्ये बचाव मोहिमेदरम्यान बिबट्याचा पोलिस, रक्षकांवर हल्ला; बचावकार्याचा Video Viral)
आजकाल सोशल मीडियावर अशा प्रकारची कोडी असलेले अनेक फोटो व्हायरल होत आहेत. नेटीझन्सनाही हे कोडी सोडवायला आवडतात हे दिसून येत. हरीण लपलेला फोटो तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवून बघा. ते हे कोडं सोडवू शकतात का बघा.