सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला देखील हसू आवरण कठीण होणार आहे. कारण एका बहाद्दराने बँकेत पैसे भरायच्या स्लिपवरती चक्क त्याची रास लिहिल्याची घटना समोर आली आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेल्यावर अनेक लोकांची फार गडबड होते. त्यामुळे माहित असणारी माहिती देखील गोंधळल्यामुळे चुकीच्या पद्धतीने लिहीली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अशाच एका खातेधारकाचा गोंधळ उडाल्यामुळे त्याने डिपॉजिट स्लिपमध्ये रक्कम लिहायच्या जागी चक्क स्वत:ची रास लिहली आहे. त्याच झालं असं की व्हायरल होत असलेल्या फोटोतील स्लिप ही हिंदीमध्ये आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रक्कम भरायची आहे, त्या रकान्याला हिंदीत ‘राशि’ असं लिहलं आहे.

आणखी पाहा- बापरे! झोपेलेल्या महिलेच्या तोंडात शिरला भलामोठा साप; अंगावर शहारे आणणारा Viral Video पाहिलात का?

त्यामुळे बँकवाल्यांना आपली रास कोणती? ही माहिती देखील हवी आहे, असं समजून त्या व्यक्तीने या स्लिपवर चक्क स्वत:ची रास ‘तुळ’ लिहली आहे. त्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच मनोरंजनाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. ही घटना १६ एप्रिलची असली तरी सध्या ती ट्रेंडीगमध्ये असून नेटकऱ्यांचा या स्लिपमुळे चांगलाच टाईमपास होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोखाली अनेकांनी भन्नाट कमेंटस् केल्या आहेत. काही जणांनी कुठून येतात असले लोक?, देशातील लोकांच्या बुद्धीमत्तेला सलाम, तर एकाने चक्क तुळ राशीचे लोक अशाच चुका करतात का? आपण तुळा राशीचे असाल आणि काही गडबड केली असेल तर कळवा असं देखील लिहलं आहे.

व्हायरल फोटोमुळे बँकवालेही झालेही ट्रोल –

आणखी वाचा- Viral Video: चालकाचा ताबा सुटलेल्या ‘टेस्ला’ची शाळकरी मुलीसह अनेकांना धडक; दोघांचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा अपघात

त्यामुळे लिहिणाऱ्याने अजाणतेपणी लिहलेल्या या स्लिपची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. या स्लिपवरील मजकुरावरुन ही घटना मुरादाबाद येथील इंडियन बॅंकेच्या शाखेतील आहे. शिवाय या खातेधारकांने डिपॉजिट स्लिपवरील इतर माहिती बरोबर लिहली आहे. फक्त राशिच्या रकान्यात त्याची गडबड झाली आणि त्याने स्वत:ची रास लिहली आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यामुळे बँकेतील कर्मचारी देखील ट्रोल होत आहेत. पैसे भरायला आलेल्या व्यक्तीने राशिच्या जागी रक्कम न लिहीता, तुळ लिहलं असलं तरी बँक कर्मचाऱ्यांनी ही रक्कम जमा करुन घेतली आहे. पैसे भरणाऱ्याकडून चुक झाली पण घेताना तुम्ही स्लिप पाहिली नाही का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral pay in slip account holder went to bank to deposit money wrote tula rashi in place of amount jap
Show comments