जंगलाचे जग खरोखरच अनोखे आहे. तिथला एक धोकादायक प्राणी म्हणजे बिबट्या, ज्याला बघून माणसचं नाही तर प्राणीही घाबरतात. सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये बिबट्या ताऱ्यांच्या कुंपणापासून वाचून अशा प्रकारे पळत आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका माहितीनुसार, काही लोकांनी त्यांच्या कारमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. ज्यामध्ये भिंतीवर लावलेल्या लोखंडी तारेच्या कुंपणावरून बिबट्या पळून जात असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी कारमध्ये बसलेले काही लोक आरसा उघडत बोलताना दिसत आहे. यादरम्यान बिबट्याला भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आवाजही ऐकू येतो. व्हिडीओमध्ये समोरचे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले.

(हे ही वाचा: फोनवर बोलत असलेली व्यक्ती पडली मेट्रो ट्रॅकवर आणि…; घटना CCTV मध्ये कैद)

(हे ही वाचा: Video: आता लग्नसोहळ्यावरही ‘पुष्पा’ची क्रेझ! नवरदेव म्हणतो ‘मैं झुकेगा नहीं…’)

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यादरम्यान बिबट्या दरवाजा ओलांडल्यानंतर थांबतो. बिबट्याने कार चालकाकडे टक लावून पाहिल्याने कार चालकाने पुन्हा काच बंद करतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक घाबरले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी वेगाने आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. एका यूजरने सांगितले की, बिबट्या खरोखरच खूप धोकादायक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral people were shocked to see leopard this video ttg