A man narrowly escaped death : सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात.हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
१७ सेकंदाचा हा व्हिडिओ खूपच भयानक आहे. ज्यामध्ये निसर्गाचे भयानक रूप पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये दिसत आहे- पाऊस पडत आहे आणि जोरदार वादळ आले आहे. वारे जोरात वाहत आहेत. एक माणूस पुलावरून जाताना दिसतो. त्याने हातात छत्री धरली आहे, तेवढ्यात अचानक एक अतिशय वेगवान पाण्याचा प्रवाह येते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात माती हवेत उडताना दिसते. तेवढ्यात हा व्यक्ती धोका ओळखून पूलावरुन पुढे पळत येतो. यावेळी दुसऱ्याच क्षणी पूल कोसळतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजोचा ठोका चुकेल. थोडा उशीर झाला असता तर हा तरुण पुलासोबत वाहून गेला असता. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण थोडक्यात बचावला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video Viral: रिसॉर्टमध्ये तरुणाचा खतरनाक अपघात! पाठीचं हाड मोडलं, कंबरेलाही मार बसून भयानक शेवट…
आपलं मरण आपल्या हातात नसतं, ते नियतीच्या हातात असतं. नशिबात असेल तर आपला कधीही मृत्यू होऊ शकतो असं अनेकजण बोलत असतात. पण काहीजण नियती किंवा नशिबावर विश्वास ठेवत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हे पाहून आपल्यालाही नशिबावर विश्वास बसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.