सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटिझन्सची उत्सुकता वाढवण्यासाठी एका कोडेपेक्षा चांगले काहीही नाही. एका हत्तींच्या कुटुंबाच्या फोटोने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे. प्राण्यांची योग्य संख्या शोधण्यासाठी नेटीझन्स जोर लावत आहेत.
IFS अधिकाऱ्यांनी शेअर केला फोटो
हा व्हायरल झालेला फोटो आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. मुळचा हा फोटो वाइल्डलेन्स इको फाउंडेशनचा आहे. हा फोटो पोस्ट करत ‘चित्रात किती हत्ती आहेत?’ असा प्रश्न आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी विचारला आहे.
(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)
प्रशंसा करताना, नंदा म्हणाले की “कोणीही क्वचितच हे ओळखू शकेल. आणि फक्त काहींनाच हे बरोबर ओळखता येईल.” हा फोटो टिपण्यासाठी हा शॉट मिळविण्यासाठी फोटोग्राफरने जवळपास १४०० क्लिक केले.
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)
जाणून घ्या योग्य उत्तर
बहुतेकांना योग्य उत्तर मिळू शकले नाही. नंदा यांनी योग्य नंबर उघड केल्यानंतरही, व्हायरल फोटोमध्ये हत्ती शोधण्यासाठी नेटीझन्स अजूनही धडपड करत आहेत. तुम्ही वरील व्हिडीओ नीट बघितला तर दिसून येईल की या फोटोमध्ये ४ नाही ६ ही नाही तर ७ हत्ती आहेत.