Viral Photo: सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून काही महिन्यांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली होती. शिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे रिझल्टदेखील लागले आहेत. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या शाळादेखील सुरू होतील. पण, शाळा-कॉलेजांमध्ये काही विद्यार्थी असे असतात, जे खूप छान पेपर लिहून चांगल्या मार्क्सने पास होतात. पण, काही अतरंगी विद्यार्थी असेदेखील असतात जे पेपरमध्ये काहीही लिहितात. अनेकदा अशा विद्यार्थांचे पेपर सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. दरम्यान, आता नुकताच असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पेपर चेकिंगदरम्यानचा असून यात एका विद्यार्थ्याने लिहिलेलं जबरदस्त उत्तर वाचून तुम्हालाही हसू येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा सोशल मीडियावर दहावी-बारावीच्या किंवा शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांपासून असे अनेक उत्तरपत्रिकेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशातच आता एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्याला “इस्त्री किती प्रकारची असते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विद्यार्थ्याने लिहिलंय की, “इस्त्री दोन प्रकारची असते. प्रेस इस्त्री, जी कपड्यांना सरळ करते आणि महिला इ-स्त्री ही पुरुषांना सरळ करते. जेव्हा दोघी खूप तापतात तेव्हा त्या जाळ काढतात. गुरुजी, दोघींमध्ये काहीही अंतर नाही, दोघी आग लावण्यात पटाईत आहेत”, अशा मजेशीर उत्तरावर शिक्षकाने विद्यार्थ्याला सरळ सरळ १० पैकी १० मार्क्स दिले आहेत. शिवाय, खाली खूप छान मुला; तू तर कमाल केलीस असंदेखील शिक्षकाने लिहिलं आहे.

उत्तरपत्रिकेचा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @n2154j या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज आणि चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “या मुलाचे शिक्षकचं थोडे विचित्र आहेत वाटतं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, शिक्षकाने बहुतेक स्वतःच लिहून स्वतः पेपर चेक केला आहे.” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “या विद्यार्थ्याचे काही खरे नाही.”

हेही वाचा:गुलाबी साडीची परदेशातही हवा; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पॉंडचा जबरदस्त डान्स, Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील अशाच प्रकारच्या बऱ्याच उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या, ज्यात विद्यार्थ्यांनी अतरंगी उत्तरं लिहिली होती. ज्यात एकाने उत्तरपत्रिकेत “मला काहीच माहीत नाही, तुम्ही मला याचं उत्तर विचारू नका”, असं लिहिलं होतं; तर दुसऱ्या एकाने त्याच्या उत्तरपत्रिकेत “जय श्री राम” असं लिहिलं होतं, तर आणखी एकाने लिहिलं होतं की, “जय माता दी.”