Viral Photo: समाजमाध्यमांमुळे कोणतीही माहिती, फोटो, व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल होतात. अनेक जण समाजमाध्यमांचा वापर समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठीही करतात; जी खूप चांगली बाब आहे. काही जण या संदर्भातील माहिती समाजमाध्यमांवर शेअर करतात; ज्यामुळे इतरांनादेखील त्याचा फायदा होतो. असाच एक फोटो एका व्यक्तीने शेअर केला आहे; जो काही क्षणांत चर्चेसाठी समोर आला आहे.

अनेकदा नावाजलेल्या हॉटेलमधील पदार्थांमध्ये किंवा बाजारातून विकत घेतलेल्या इतर पदार्थांमध्ये कधी कधी चुकीच्या गोष्टी आढळतात. तसेच, कधी जो पदार्थ ऑर्डर केला जातो, त्याच्या जागी दुसराच पदार्थ आणून दिला जातो. मग त्यामुळे गैरसोय झाल्यावर अनेकदा ग्राहक वैतागून, त्याचे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले जातात. आता असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे; ज्याबाबत त्याने समाजमाध्यमावर माहिती शेअर केली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

ही माहिती X(ट्विटर)वरील @Shobhit Siddharth या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे; ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने बिल आणि आलेले जेवण यांचा फोटो शेअर केला आहे, तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “Zomato काळजी घ्या, पनीर थाळीची ऑर्डर असताना मांसाहारी थाळी का पाठवली? शाकाहारी व्यक्तीनं चिकन खावं, अशी तुमची अपेक्षा कशी आहे? जिच्यासाठी व्हेज थाळी मागवली, ती एक गर्भवती महिला आहे. जर तिला काही त्रास झाला असता तर?” असे लिहीत त्या व्यक्तीने @zomato @zomatocare ला टॅग केले आहे.

माहितीनुसार, ही व्यक्ती बंगळुरूमधील असून, त्याने त्याच्यासाठी मांसाहारी आणि त्याच्या गरोदर पत्नीसाठी शाकाहारी पनीर थाळी मागवली होती. पण, झोमॅटोच्या निष्काळजीपणामुळे त्याला दोन्ही मांसाहारी थाळी पाठविण्यात आल्या. या फोटोवर झोमॅटोनेही प्रतिक्रिया दिली आहे; ज्यात लिहिण्यात आलंय, “आम्ही ही चूक सुधारतो आणि तुमच्यासाठी ही बाब किती त्रासदायक असेल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आम्ही तुमची आहारातील प्राधान्ये खूप गांभीर्याने घेतो आणि त्यांचा अनादर करण्याचा आमचा कधीही हेतू नाही. कृपया हे तपासण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या आणि आम्ही कॉल किंवा ईमेलद्वारे तुमच्याशी संपर्क साधू.”

एका व्यक्तीने झोमॅटोच्या या प्रतिक्रियेवरही संताप व्यक्त केला आहे; ज्यात त्याने लिहिलेय, “चुक सुधारण्यासाठी तुम्ही गरोदर स्त्रीसाठी मोफत व्हेज थाळी आणि नवऱ्यासाठी आज आणखी एक कॉम्प्लिमेंटरी नॉनव्हेज थाळी पाठवलीत, तर आभाळ कोसळणार नाही”

हेही वाचा: अरे बापरे! या सापाला आहेत चक्क चार पाय; Viral Video पाहून युजर्स म्हणाले…, “ही तर सापाची मावशी”

पाहा फोटो:

दरम्यान, यापूर्वीदेखील पुण्यातील एका व्यक्तीने झोमॅटोद्वारे पनीर बिर्याणीची ऑर्डर दिली होती, मात्र, त्याला जेवणात चिकनचा तुकडा सापडला, त्यावेळी त्याने X (ट्विटर)वर “पीके बिर्याणी हाऊस, कर्वे नगर, पुणे, महाराष्ट्र येथे पनीर बिर्याणीची ऑर्डर दिली. परंतु, मला त्यात चिकनचा तुकडा सापडला (मी शाकाहारी आहे),” असं लिहून व्हिडीओसोबत माहिती शेअर केली होती. तसेच त्याच्या पोस्टमध्ये त्याने, “मी धार्मिक व्यक्ती असल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत”, असेदेखील त्यात लिहिले होते.

Story img Loader